दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या आयुष्याला आकार देणारी पोलीस दादालोरा खिडकी… — पोलीस दादालोरा खिडकी अंतर्गत भरतीपूर्व प्रशिक्षण घेतलेल्या ८५ युवक- युवतींची गडचिरोली जिल्हा पोलीस दलात निवड.

डॉ.जगदीश वेन्नम

  संपादक

       गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त व दुर्गम अतीदुर्गम भागातील बेरोजगार युवक-युवतींना शासकीय नोकरीची संधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने गडचिरोली पोलीस दल गडचिरोली पोलीस दादालोरा खिडकी तसेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली/ अहेरी/ भामरागड व जिल्हा कौशल्य विकास विभाग यांचे संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील युवक-युवतींना पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण, मोटार ड्रायव्हिंग प्रशिक्षण व इतर रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन त्यांना नोकरी मिळवण्याकरीता आत्मनिर्भर होण्याच्या उद्देशाने प्रशिक्षण राबविले आहे.

पोलीस दादालोरा खिडकी जिल्ह्यातील युवक युवतींना प्रशिक्षण देण्याकरीता नेहमी प्रयत्नशिल आहे. सदर पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणात एकुण सहा बॅचेस मध्ये गडचिरोली जिल्ह्यातील रहिवासी असलेले १०७९ विद्यार्थ्यांना भरतीपूर्व प्रशिक्षण देण्यात आले. सदर प्रशिक्षणामध्ये ८२० युवक व २५९ युवतींचा समावेश होता. ३० दिवसांचे निवासी प्रशिक्षण कालावधीत प्रशिक्षणार्थ्यांना मैदानी चाचणी व लेखी परीक्षाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. पोलीस भरती करीता आवश्यक मैदानी चाचणीचे किट (टी-शर्ट, लोअर, शुज इ.) व लेखी परीक्षेकरीता आवश्यक पुस्तकांचा संच मोफत पुरविण्यात आले. यासोबतच ५०५ युवक युवतींना मोटर ड्रायव्हिंग प्रशिक्षण पोलीस मुख्यालय गडचिरोली येथे देण्यात आले.

याचप्रमाणे पोस्टे / उपपोस्टे / पोमके स्तरावरही भरतीपूर्व प्रशिक्षण राबविण्यात आले असून, यामधुन ८५ युवक-युवतींनी गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीमध्ये मैदाणी चाचणी व लेखी परिक्षेत चांगले गुण मिळवून, नुकत्याच जाहीर झालेल्या पोलीस चालक व पोलीस शिपाई पदाच्या तात्पुरत्या निवड यादीत यश संपादन केले आहे. यामध्ये गडचिरोली उपविभागातून १५, कुरखेडा ८, धानोरा ८, पेंढरी ५, एटापल्ली २, अहेरी १७, भामरागड ३, सिरोंचा १९ व जिमलगट्टा १० असे एकुण ८५ प्रशिक्षणार्थीनी यश प्राप्त केले आहे.

गडचिरोली पोलीस शिपाई व चालक शिपाई मध्ये यशस्वी झालेल्या सर्व उमेदवारांचे गडचिरोली पोलीस दलाचे वतीने मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. यांनी अभिनंदन केले असुन त्यांच्या पुढील वाटचालीकरीता शुभेच्छा दिल्या आहेत.