स्वाभिमान म्हणजे परापमान नव्हे.

         “अस्पृश्य वर्ग अशा जागृत अवस्थेत आला असताना वर्णाभिमान्यांनी त्यांची मने न दुखवतील अशा बेताने आपल्या वर्णाभिमानाला योग्य ती मर्यादा घालणे अवश्य आहे. कोणीही आपला स्वाभिमान, कुलाभिमान, जात्यभिमान हवा तर धरावा.

               पण स्वाभिमान म्हणजे परापमान नव्हे ही गोष्ट क्षणभरही विसरू नये. आपण जातीने अलग आहोत असे कुणी हवे त्याने समजावे. पण इतर जातींपेक्षा आपण श्रेष्ठ आहोत असे समजून आपला श्रेष्ठपणा इतर जातीस भासवून त्यांची मने दुखू नयेत. नाहीतर दुखावलेला सर्प जसा दंश करण्यास विसरत नाही तसा दुखावलेला माणूस सूड घेण्यास विसरणार नाही.”!!!

— डॉ. बाबासाहेब आंबेडकर

(संदर्भ-डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड-१९, पान नं. २०७.)

           दि.१५ जुलै १९२७ रोजी “बहिष्कृत भारत” मध्ये प्रकाशित झालेला बाबासाहेबांचा लेख.

                  संकलन

       आयु.प्रशांत चव्हाण सर.