मध्यप्रदेश व छत्तीसगड मध्ये समाधानकारक मतदान.. — बसपा-गोंडवाना गणतंत्र पार्टी रोखणार भाजपा-कांग्रेसची घोडदौड.. — न घाबरता मतदारांनी बजावला मताधिकार…

प्रदीप रामटेके

  मुख्य संपादक

            मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यामध्ये विधानसभा निवडणूक संबंधाने आज मतदान प्रक्रिया पार पडली.दोन्ही राज्यातील मतदारांनी न घाबरता मताधिकार बजावला असल्याची माहिती पुढे आली आहे.

             मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्यात भरघोस मतदान झाल्याने एकहाती सत्ता हस्तगत करण्याचे भाजपा व काँग्रेस पक्षाचे स्वप्न धुळीस मिळणार असल्याचे आता चिन्हे दिसू लागली आहेत.

             विधानसभा निवडणूक संबंधाने मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यात बसपा व गोंडवाना गणतंत्र पार्टीची युती झाल्याने तेथील एससी-एसटी व इतर अल्प समाज घटकातील मतदार एक झाला होता.दोन्ही राज्यातील एसी,एसटी व इतर अल्प समाज एक झाल्याने ओबीसी समाजाच्या विविध संघटनांनी बसपा व गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या उमेदवारांना समर्थन दिले होते.

           यामुळे मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यात बसपा आणि गोंडवाना गणतंत्र पार्टी शिवाय काँग्रेस व भाजपा सत्ता स्थापन करु शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

            किंवा बसपा व गोंडवाना गणतंत्र पार्टीला सहकार्य करुनच कांग्रेस किंवा भाजपाला दोन्ही राज्यात सत्तेत पोहोचता येईल असे तेथील राजकीय समीकरण आहे.