सुधाकर दुधे
सावली तालुका प्रतिनिधी
प्रत्येक विद्यार्थ्याने प्रशासकीय सेवेत यशाचे शिखर गाठावे या हेतूनेच मी पुढाकार घेऊन सामान्य ज्ञान स्पर्धेचे, तसेच स्पर्धा परीक्षाचे मार्गदर्शन करणारी पुस्तके वितरण करीत आहे. आपण या संधीचे सोने करीत भविष्यात उच्चशिक्षित होऊन समाजाच्या प्रगतीची कास धरावी असे आवाहन राज्याचे माजी विरोधी पक्षनेते तथा विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी केले ते सावली येथे तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित सामान्य ज्ञान स्पर्धेचे बक्षीस व स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांचे वितरण सोहळ्या प्रसंगी अध्यक्ष म्हणून बोलत होते.
आयोजित सोहळ्यास प्रामुख्याने माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती दिनेश चिटणुरवार,माजी जि.प.सदस्य ॲड.राम मेश्राम,माजी तालुका अध्यक्ष बंडू बोरकुटे,तालुका अध्यक्ष नितीन गोहने,महिला तालुका अध्यक्ष उषा भोयर, सावली नगराध्यक्ष साधना वाढई,शहर अध्यक्ष व नगरसेवक विजय मुत्यालवार,माजी प.स.सभापती राकेश गड्डमवार,माजी प.स.सभापती विजय कोरेवार,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजू ठाकरे,माजी उपसभापती दिवाकर भांडेकर,विविध कार्यकारी सोसायटी अध्यक्ष मुन्ना स्वामी, युवक तालुका अध्यक्ष किशोर कारडे,महिला शहर अध्यक्ष भारती चौधरी यांचेसह अनेक मान्यवर मंचावर उपस्थित होते.
यानंतर नुकत्याच पार पडलेल्या सामान्य ज्ञान स्पर्धेत प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक, प्रशस्ती पत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. सोबतच सावली तालुक्यातील होतकरू व शिक्षणार्थी 500 विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांचे वितरण करण्यात आले.
सावली शहरातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व, सर्वांचे वाढदिवस अगदी तोंडपाठ ठेवणारे, स्वच्छता मित्र व सामाजिक दायित्व जोपासणारे,पर्यावरण संवर्धन व विकास समितीचे तालुका कार्याध्यक्ष परेशजी तावडे त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल राज्याचे लोकलेखा समितीचे अध्यक्ष तथा काँग्रेस विधिमंडळ गटनेते आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांनी स्वच्छतादूत व सामाजिक कार्यकर्ते प्रशांत तावाडे यांची पाठ थोपत पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



