शिस्तभंगाच्या नियमानुसार वनपरिक्षेत्राधिकारी निलंबित…… — योग्यरित्या कर्तव्य पार पाडत नसल्याचा ठपका…

 

ऋषी सहारे

संपादक

भंडारा – हिरालाल धनराज बारसागडे नामक वनपरिक्षेत्र अधिकारी,पवनी (प्रादेशिक), भंडारा वनविभाग यांचेविरुध्द शिस्तभंगाची कार्यवाही करण्याचे योजीले आहे. 

        त्याअर्थी,आता उक्त हिरालाल धनराज बारसागडे, वनपरिक्षेत्र अधिकारी पवनी (प्रादेशिक),भंडारा वनविभाग यांना महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम,1979 च्या नियम 4 च्या पोटनियम (1) (अ) च्या तरतुदीनुसार आदेश जारी झाल्याचे तारखेपासून तात्काळ निलंबीत करण्यात आले आहे.

         आणखी असाही आदेश देण्यात आला की,हा आदेश अंमलात असेल तेवढ्या कालावधीत हिरालाल धनराज बारसागडे,वनपरिक्षेत्र अधिकारी, पवनी (प्रादेशिक), भंडारा वनविभाग यांचे मुख्यालय उपवनसंरक्षक,भंडारा वनविभाग,भंडारा यांचे कार्यालय येथे राहतील आणि हिरालाल धनराज बारसागडे यांना निम्न स्वाक्षरीकर्ता अधिकारी यांचे पूर्व परवानगी शिवाय मुख्यालय सोडता येणार नाही.

           दिनांक 28.06.2023 रोजी पवनी वनपरिक्षेत्रातील मोजा खातखेडा येथे वनविभागाचे अधिकारी/कर्मचार यांचेवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचे अनुषंगाने घडलेल्या घटनेचा अभ्यास,सुक्ष्म अवलोकन व वस्तूनिष्ठ चौकशी करणे करीता समिती गठीत करण्यात आली होती. 

            उक्त समितीव्दारे प्राप्त अहवालानुसार,पवनी वनपरिक्षेत्रातील मौजा गुडेगांव येथे दिनांक 23.06.2023 रोजी गुरे चारणार सुधाकर सिताराम कांबळे यांचेवर वाघचा हमला झाला होता व त्यात त्यांचा मृत्यु झाला होता. 

         त्यावेळी गावकरी आणि वन कर्मचारी यांच्यात घटनास्थळी संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली होती.उक्त घटनेच्या वेळी वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून हिरालाल धनराज बारसागडे हजर नव्हते.सदर घटनेचे गांर्भिय लक्षात घेऊन पवनी वनपरिक्षेत्रातील विविध गावात वनकर्मचारांद्वारे दि. 24.06.2023 ते 27.06.2023 पर्यंत सामुहीक गस्त करण्यात आली.परंतू त्यात सुध्दा हिरालाल धनराज बारसागडे वनपरिक्षेत्र अधिकारी यांचा सहभाग नव्हता.

            तसेच,दिनांक 28.06.2023 रोजी मौजा खातखेडा या गावात ईश्वर सोमा मोटघरे यांचेवर वाघाचा हल्ला झाला व ते देखील मृत्यु पावले.सदर घटनेची माहिती मिळताच यशवंत भाऊराव नागुलवार,सहाय्यक वनसंरक्षक आणि इतर कर्मचारी घटना स्थळी पाहणी करण्याकरीता गेले असता,गावकऱ्यांकडून वन अधिकारी/कर्मचारी यांचेवर हल्ला करण्यात आला व त्यात त्यांना गंभिर जखमी करण्यात आले होते. 

        सदर घटना ही पवनी वनपरिक्षेत्रातंर्गत घडली असल्याने बारसागडे यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी या नात्याने तात्काळ घटना स्थळी हजर होवून त्याबाबत वरिष्ठांना कळविणे,वन कर्मचाऱ्यांच्या मदतीने जमावावर नियंत्रण ठेवणे व ग्रामस्थांना समजावून परिस्थिती आटोक्यात आणणे हे त्यांचे कर्तव्य होते. 

          परंतू ते घटना स्थळी उपस्थित झाले नाही.सदर घटनेचा रोष म्हणून गावकऱ्यांनी घटनास्थळी असलेल्या इतर अधिकारी/कर्मचारी यांचेवर हल्ला करुन अमानुषरित्या मारहान केल्याची गंभीर घटना घडलेली आहे.

           तसेच वनपरिक्षेत्रातील वन्यप्राणी नुकसानीचे प्रकरणात प्रकरणे प्रलंबीत ठेवणे,शेत कन्यासमक्ष अधिनस्त कर्मचाऱ्यास असभ्य भाषेचा वापर करणे.गावकरी व लोकप्रतीनीधी यांचेशी उध्दटपणे वागणे तसेच अधिनस्त वनकर्मचारी यांनी त्यांच्या असभ्य वागणुकी बद्दल निवेदन देणे,तसेच निम्न स्वाक्षरीकर्ते यांचे दालनात येऊन हिरालाल धनराज बारसागडे,वनपरिक्षेत्र अधिकारी पवनी यांच्या असभ्य वर्तणुकी बद्दल विवेचन केले.

            सदर बाबींची चौकशी करुन व त्यांच्या प्रति जनतेचा व अधिनस्त वनकर्मचाऱ्यांचा रोष बघता ते आपले कर्तव्य निर्वहन योग्यरित्या करीत नसल्याचे दिसुन येत असल्याने हिरालाल धनराज बारसागडे वनपरिक्षेत्र अधिकारी पवनी यांना शासन सेवेतून निलंबीत करण्यात येत आहे.असे आदेश 

श्रीलक्ष्मी.ए वनसंरक्षक (प्रादे.), नागपूर वनवृत्त नागपूर यांनी काढले आहेत.