Home क्रीडा “जिल्हा क्रीडा स्पर्धेत जे एस पी एम महाविद्यालय अव्वल”…

“जिल्हा क्रीडा स्पर्धेत जे एस पी एम महाविद्यालय अव्वल”…

भाविकदास करमनकर

 धानोरा तालुका प्रतिनिधी 

        क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद गडचिरोलीच्या वतीने जे एस पी एम च्या संघानी बेस बॉल स्पर्धेत सहभाग घेऊन अंतिम सामन्यात गोंडवाना सैनिक विद्यालय व जे एस पी एम महाविद्यालय धानोरा यांच्यात अंतिम सामना होऊन या अंतिम सामन्यात गोंडवाना सैनिक विद्यालयाचा पराभव करत जे एस पी एम महाविद्यालय धानोरा चा संघ विजयी झाला असून विभागीय स्तरावर आपल्या खेडाची चुणूक दाखवण्यास सज्ज झाला आहे.

          उत्कृष्ट कामगिरी करत जे एस पी एम महाविद्यालयांचे नाव उंचावले असल्याने श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्थेचे अध्यक्ष श्रीमती शालिनीताई रमेशचंद्र मुनघाटे संस्थेचे सचिव सौ.मिलन ऋषी सहानी व महाविद्यालयांचे प्राचार्य डॉ.उदय थुल आणि महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापकयांनी विजेत्या संघाचे अभिनंदन करून विभागीय स्तरावर तालुक्याचे नेतृत्व करण्यासाठी शुभेच्छा दिले. 

        यावेळी महाविद्यालयांचे प्राचार्य यांनी पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.