सोनसरी ते चांदागड मार्गावरील एल मोळी वरती असलेली झाडे झुडपे मित्रांनी केली साफ…   — अपघात टाळण्यासाठी पार पाडले कर्तव्य…

 

     राजेंद्र रामटेके 

तालुका प्रतिनिधी कुरखेडा

           मौजा सोनसरी येथे ग्रामीण शाळेजवळ प्राणघातक मोळ वरती नेहमी अपघात होत होते.होणारे अपघात टाळण्यासाठी मित्रांनी एकमेकांच्या मदतीने झाडेझुडपे तोडून उत्तम कर्तव्य पार पाडले असल्याचे समोर आले आहे.

           सोन्सरी येथील गाव मित्रांनी L मोळीवरती असलेली झाडे झुडपे साफ करून प्रवासांना दिलासा दिलाय व पुढील अपघात घटना टाळून प्रवाशांना एक प्रकारचे जीवनदान दिले आहे.

        या मोळी वरती असलेले झाडे झुडपे साफ केल्याने येणारे जाणारे प्रवाशी खुश झाले असून लोकामध्ये साफ करणाऱ्या तरुणांविषयी आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

         आशिष मेश्राम,भुवन गुरुकर,तुषार धकाते,गणेश दहिकर,रोहन गुरूकर या तरुणांनी मोलाचे काम केले असल्याची जनमानसात चर्चा आहे.