सुधाकर दुधे
सावली तालुका प्रतिनिधी
दि. 16/6/25 : सावली वनपरिक्षेत्रात वाघ, बिबट, अस्वल, रानटी डुक्कर व जंगली हत्तींचा सतत धुमाकूळ असल्याने वारंवार मानव वन्यजीव संघर्षाची घटना घडत आहेत. त्यामुळे सावली वनपरक्षत्रातील संपूर्ण वन कर्मचारी 24×7 याप्रमाणे वन्यप्राणी बंदोबस्त, अवैध वृक्षतोड, अवैध शिकार, वनवनवा, अवैध अतिक्रमण, अवैध उत्खनन, अवैध चराई , तसेच कार्यआयोजना व रोपवन आणि जलमृद संधारणाची कामे, न्यायालयीन कामे शेती व पशुधन हानी नुकसान भरपाई देण्याचे कामात सतत व्यस्त असताना वेळेचे बंधन नाही.
तरीही चंद्रपूर जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्षाच्या घटना वारंवार घडत आहे यावर आळा बसवून सतत होणारी जीवितहानी कमी करण्याचे दृष्टिकोनातून शेतकरी गुराखी शेतमजूर व सर्वसामान्य नागरिकांच्या सहकार्याशिवाय शक्य नाही म्हणून सावली वनपरिक्षेत्रात श्री विनोद धुर्वे वनपरीक्षेत्र अधिकारी सावली यांनी श्री प्रशांत खाडे विभागीय वनाधिकारी चंद्रपूर, व विकास तरसे सहाय्यक वनसंरक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाखाली चंद्रपूर वनविभाग चंद्रपूर व मनोरमा बहुउद्देशीय विकास संस्था नवेगाव यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक 13.6.25 ते 16.6.2025 चे दरम्यान चितेगाव, गेवरा, टेकाडी व सिरसी येथे मानव वन्य जीव संघर्षावर आधारित कलापथकाद्वारे जनजागृती पर कार्यक्रम पार पडले.
सदरचे चारही जनजागृतीपर कार्यक्रमास संस्थेचे संस्थाध्यक्ष श्री सुशीलजी सहारे प्रमुख मार्गदर्शक म्हणून निवृत्त मुख्य लेखापाल श्री राखुंडे उपस्थित होते. मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन श्री विनोद धुर्वे वनपरिक्षेत्र अधिकारी सावली यांनी अध्यक्षीय भाषणातून केले सदरचे कार्यक्रमाचे यशस्वीतेकरिता क्षेत्र सहाय्यक श्री राजू कोडापे, श्री सुरेंद्र सिंग वागडोद श्री नंदकिशोर पाटील, श्री रवी सूर्यवंशी, श्री अनिल मेश्राम, वनरक्षक श्री अविनाश नाने प्रिया शेंडे श्री राजू मुरकुटे श्री लंकेश आखाडे श्री सुखदेव बोणलवार श्री भुलेश्वर सोनेकर श्री डांगे, श्री मुंडे, श्री एकनाथ खुडे, सतीश नागोसे,श्रीराम आदे , आणि नियतक्षेत्र मदतनीस श्री तुषार कन्नाके श्री सुरेश बावणे, विनोद वाघरे बंडू दुधे आणि पीआरटी चमू गेवरा चितेगाव शिरसी टेकाडी व इतर वन कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.



