Home देशविदेश चिमूर तालुक्यातील अवैध धंदे आमदार किर्तीकुमार भांगडिया बंद करतील काय? —...

चिमूर तालुक्यातील अवैध धंदे आमदार किर्तीकुमार भांगडिया बंद करतील काय? — लाडक्या बहिणींच्या हिताची व त्यांच्या योग्य संसाराची महाराष्ट्र सरकारला आणि महाराष्ट्र राज्यातील पोलिस विभागाला काळजी आहे काय?  — पोलिस अधिकाऱ्यांत कर्तव्यदक्षता,सचोटी,योग्य मन,योग्य विचार,आणि आवश्यक शक्ती नाही?

 रोखठोक

प्रदीप रामटेके

  मुख्य संपादक

      अवैध धंद्यामुळे समाज बरबाद होत असताना चिमूर तालुक्यातील जबाबदार पोलिस अधिकारी,अवैध धंद्यांकडे अजिबात लक्ष देताना दिसत नाही.यामुळे समाजाच्या योग्य विचारांशी,योग्य भुमिकांसी,उत्तम आरोग्यासी,योग्य मनासी,पोलिस विभागाचे काहीही सोयरसुतक नाही असेच गृहित धरावे लागेल..

           चिमूर तालुक्यात अवैध धंदे जोमाने सुरू असण्याचे कारणे काय? याबाबत सर्वसामान्य नागरिकांसी चर्चा केली असता,”हप्तेखोरी आणि पोलिस विभागाची व अवैध धंदेवाईकांची शिरजोरी,समाज मनावर हावी होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

        मटका,जुगार,ड्रग्स,अवैध दारू विक्री आणि गुटखा यांसारखे अवैध धंदे चिमूर तालुक्यात फोफावले असून,यामुळे तरुण पिढी उद्ध्वस्त होत आहे आणि समाजात गुन्हेगारीचे प्रमाणही वाढत आहे.

           पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे किंवा मिलीभगतमुळे हे धंदे राजरोसपणे सुरू राहतात,ज्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

         अवैध धंद्यांमुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडत असून,महिला सुरक्षिततेचा प्रश्नही गंभीर होत आहे.अवैध धंद्यांचे समाज मनावर होणारे परिणाम म्हणजे तरुणाईचे अध:पतन,अनेकांच्या संसाराची होणारी राखरांगोळी,अनेकांच्या संसारात पसरणारे नैराश्य,अनेकांच्या संसारात शिरकाव केलेले दारिद्र्य होय.

         कमी गुंतवणुकीत जास्त नफ्याच्या मानसिकतेमुळे तरुण मटका,जुगार आणि अमली पदार्थांच्या जाळ्यात अडकत आहेत.

          याचबरोबर अवैध धंद्यांमुळे संघटित गुन्हेगारीला खतपाणी मिळत असून ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्था बिघडत आहे.तद्वतच अवैध धंद्यांमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत.अवैध दारु,गुटखा,आणि ड्रग्स विक्रीमुळे तरुण पिढीच्या आरोग्याशी खेळ खेळला जात आहे.

           पोलिस प्रशासनावरील अविश्वास म्हणजे अवैध धंद्यांच्या कारवाई बाबतचा हलगर्जीपणा होय.पोलिसांच्या प्रतिमेवर डाग लागला असल्याने लोकांचा पोलिस प्रशासनावरील विश्वास कमी होत आहे.

       प्रमुख अवैध धंदे मटका,जुगार,सट्टा आणि अवैध मद्यविक्री,गुटखा तस्करी,गांजा विक्री,अवैध गौण खनिज उत्खनन हे चिमूर तालुक्यात सर्रास सुरू आहेत.

           पोलिस प्रशासनाने अवैध धंद्यांविरोधात कडक कारवाई करावी अशी अपेक्षा सर्व समाज घटकातील महिला-पुरुषांची आहे.

         पण,चिमूर तालुकातंर्गत पोलिस विभागाच्या अधिकाऱ्यांत ते सचोटी,कर्तव्यदक्षता,योग्य विचार,योग्य मन आणि आवश्यक शक्ती नसल्यामुळे ते अवैध धंदे बंद करतील आणि अवैध धंद्येवाईकांवर संघटित गुन्हेगारी अंतर्गत कारवाई करतील असे अजिबात नाही…

             पोलिस विभाग,सामाजिक सुरक्षा विभाग आणि अमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई तेज करावी व बेकायदेशीर कृत्यांमध्ये सामील असलेल्यांवर कठोर कारवाई करावी,ही उत्तम भावना नागरिकांची आहे.पण,संबंधित सर्व विभाग हे सध्यातरी मृतावस्थेत आढळून येत आहेत.

           सदर अधिकारी अवैध धंद्यांच्या बाबतीत मृतावस्थेत असल्याने त्यांना जिवंत करण्याचे काम चिमूर विधानसभा मतदारसंघातील आमदार किर्तीकुमार भांगडिया करु शकतात,याबाबत त्यांच्यावर थोडा विश्वास दाखवायला हरकत नाही.

         अवैध धंद्यात स्थानिक पातळीवरील राजकीय पक्षांचे पदाधिकारी,कार्यकर्ते,एकमेकांना सहकार्य करणारे इसम,कंपनी संचालक हे गुंतून असल्याने आमदार किर्तीकुमार भांगडिया यांच्यासाठी आव्हानात्मक काम असले तरी, समाज सुरक्षेसाठी आणि लाडक्या बहिनींच्या योग्य संसारासाठी ते चिमूर विधानसभा मतदारसंघातील आणि महाराष्ट्र राज्यातील अवैध धंदे बंद करतील अशी अपेक्षा बाळगणे अपेक्षित आहे.याला कारण म्हणजे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याचे प्रमुख आहेत आणि आमदार किर्तीकुमार भांगडिया यांच्या अगदी जवळचे आहेत.

           चिमूर येथे झालेल्या कार्यक्रमात आमदार किर्तीकुमार भांगडिया हे आपल्या मार्गदर्शनात म्हटले होते माझ्याकडे रुपयांना काही कमी नाही.म्हणजेच त्यांच्याकडे अरबो रुपये असतील असे सुध्दा मानूया!…

          आमदार किर्तीकुमार भांगडिया यांनी बाराशेच्या वर कंपनीचे रिजिष्टर केले आहे आणि त्यांच्या लहान भावांनी म्हणजे श्रिकांत भांगडिया यांनी सोळाशेच्या वर कंपनीचे रिजिष्टर केले आहे.म्हणजे ते त्या कंपनीचे मालक होते व आहेत.या पैकी शेकडा ९० टक्के कंपन्या व्यवसायीक असाव्यातच यात दुमत नाही…

        म्हणजेच त्यांनी व त्यांच्या लहान भावांनी व्यवसायाच्या माध्यमातून अरबो-खरबो रुपये कमावले असतील हे नाकारता येत नाही.कसे कमावले असतील ते त्यांनाच माहीत.पण या कमावलेल्या रुपयापैकी काही रुपये अवैध धंदे बंद करण्यासाठी सार्थकी लावले तर बरे होईल!…

       प्रश्र्न हा पडतो की,चिमूर तालुक्यात राजकीय पक्षांचे काही पदाधिकारी व कार्यकर्ते,आणि इतर इसम हे अवैध धंद्याकडे ओढले गेले की ओढवल्या गेले,यावर आमदार किर्तीकुमार भांगडिया केव्हा योग्य विचार करतील आणि अवैध धंद्यांना अनुसरून केव्हा योग्य भूमिका पार पाडतील?…

       आमदार किर्तीकुमार भांगडिया हे स्वत:ला गुरुदेव भक्त मानतात आणि ते गुरुकुंज मोजरी येथील स्वंस्थेचे संचालक आहेत.

        यामुळे त्यांच्यावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा व कार्याचा प्रभाव आहे,असेही त्यांच्या वाणीतून अनेकदा मार्गदर्शन करताना निघाले आहे.

          म्हणूनच त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांना व त्यांच्या कार्यांना स्मरुन तरी चिमूर तालुक्यातील सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद केले पाहिजे,या मताची जनता आहे.

      जनता उघड बोलत नाही,याचा अर्थ असा नाही की ते आमदार किर्तीकुमार भांगडिया यांच्या कार्यासी,भुमिकांसी सहमत असतील….

        आमदार किर्तीकुमार भांगडिया हे आपल्या राजकीय व शासन शक्तीचा पावर वापरून चिमूर तालुक्यातील अवैध धंदे बंद करतात काय?

       याकडे लेखनीचे लक्ष केंद्रित आहे!…