लक्षवेधी
प्रा.महेश पानसे…
जिल्ह्यातील मूल तालुका मुख्यालयापासून 7 कि. मी. अंतरावर विस्थापित पुरातन व निसर्गरम्य ” सोमनाथ ” देवस्थान परिसरास शासनाने ‘ब’ वर्ग पर्यटन स्थळ घोषित केले.
क्षेत्राचे आमदार तथा माजी अर्थमंत्री व वनमंत्री सुधिर मुनगंटीवार यांनी या विलोभनीय परिसराकरीता तब्बल शंभरावर कोटीचा निधी आणून या परिसरास स्वर्ग बनविले.
पर्यटकांचा मोठा लोंढा या पर्यटन स्थळाकडे आकर्षित झाला खरा मात्र या देवस्थान परिसराचे प्रवेशद्धारातच जुगार, सट्टा व तुफान सुरू असलेल्या अवैध दारू अड्डयांनी पर्यटकांचे स्वागत होत असल्याने सोमनाथ परिसर अप्रेक्षणीय ठरू लागल्याची ओरड सुरू झाली आहे.
मूल शहरापासून अवघ्या 7 कि.मी.अंतरावर हेमाडपंथी पुरातन देवस्थान वनराईने नटलेल्या जंगलव्याप्त डोंगरांवर वसलेले आहे.
पुरातन महादेव मंदीर पावन असल्याची श्रद्धा भाविकांना सतत आकर्षित करीत राहीली आहे. या देवालय परिसरापासून अवघ्या किलोमीटर अंतरावर पद्मश्री बाबा आमटे यांचे प्रसिद्ध ‘आमटे फार्म’ वसलेले आहे.
पुरातन सोमनाथ देवस्थान, लागून असलेले प्रसिद्ध आमटे फार्म, वनराईने नटलेला सभोवतालचा डौलदार ताडोबा-अधारी वनक्षेत्र लक्षात घेऊन शासनाने तब्बल शंभरावर कोटीचा निधी खर्च करुन या क्षेत्राला ‘ब’ दर्जाचे प़ेक्षणीय स्थळ घोषीत केले.
ताडोबा क्षेत्र पर्यटनासाठी खास ‘ एन्ट्री गेट’ सुरू करण्यात आले. मात्र मूल शहराबाहेर निघताच सर्रास सुरू झालेल्या बेकायदेशीर भाल धंद्यांनी या पर्टयटन स्थळाचा पार पचका करून टाकल्याची खंत व्यक्त होत आहे.



