शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
नगरपरिषद चिमूर सार्वत्रिक निवडणूक – 2025 च्या पार्श्वभूमीवर,मतदार जागरूकता आणि सहभाग कार्यक्रम (SVEEP) अंतर्गत,ग्रामगीता महाविद्यालय चिमूर आणि नगरपरिषद चिमूर यांच्या संयुक्त वतीने दिनांक 12 नोव्हेंबर 2025 ला मतदान जनजागृती करिता ग्रामगीता महाविद्यालयात ‘मतदान शपथ’ घेण्यात आली आणि विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा,पोस्टर स्पर्धा तसेच चिमूरकरांना मतदानासाठी जागृत करण्याकरिता रिल्स बनवण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली.
या कार्यक्रमात महाविद्यालयातील निवडणूक साक्षरता मंडळ (ELC) च्या सक्रिय सहभाग होता आणि महाविद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इथेच न थांबता या मोहिमेला पुढे नेत दिनांक 16 नोव्हेंबर 2025 रोज रविवारला ग्रामगीता महाविद्यालय चिमूर आणि नगरपरिषद चिमूर यांच्या संयुक्त वतीने पिंपळनेरी,हजारे पेट्रोल पंप चौक आणि चावडी चौक येथे मतदान जनजागृती करिता पथनाट्य सादर करण्यात आले आणि नागरिकांना मतदान करण्याकरिता आवाहन करण्यात आले.
तसेच ग्रामगीता महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि निवडणूक साक्षरता मंडळाचे स्वयंसेवक आपापल्या क्षेत्रातील नागरिकांना मतदान करण्याकरिता प्रोत्साहित करत आहेत.
या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी डॉ.सुनंदा आस्वले,प्राचार्या,ग्रामगीता महाविद्यालय चिमूर आणि श्रीमती अर्चना वंजारी,मुख्याधिकारी,नगरपरिषद चिमूर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.बिजनकुमार शील,रा.से.यो कार्यक्रमाधिकारी,ग्रामगीता महाविद्यालय चिमूर,श्री.शुभम बांगरे,इंजिनियर,नगर परिषद चिमूर,कु.राजश्री फुलझले,कर व प्रशासकीय अधिकारी,नगर परिषद चिमूर,प्रा.हितेश ढेंगरे,ग्रामगीता महाविद्यालय चिमूर,प्रा.निकेश,तसेच कु.गौरी चंदनखेडे व चमू सतत प्रयत्न करत आहेत.



