प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
“भारतीय संविधान दिन व संविधान अंमलबजावणी दिन,यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त संविधान जागरण परिषदेचे आयोजन औरंगाबाद येथे ७ डिसेंबर २०२५ रोज रविवारला करण्यात आले आहे.
संविधान परिषदेचे उद्घाटक सर्वोच्च न्यायालयाचे जेष्ठ विधितज्ञ अँड.महम्मूद प्राचा असणार आहेत तर संविधान परिषदेचे अध्यक्ष माजी जिल्हा न्यायाधीश अँड.प्रकाश परांजपे असणार आहेत.
याचबरोबर मुख्य वक्ते म्हणून जेष्ठ पत्रकार निरंजन टिकले (नाशिक),अँड.स्मिता कांबळे उच्च न्यायालय नागपूर हे असणार आहेत.
याचबरोबर संविधान परिषदेचे स्वागताध्यक्ष इंजि.अशोक येरेकर संभाजी नगर हे असणार आहेत.
*****
महत्त्वपूर्ण….
“येणाऱ्या २६ जानेवारी १९५० रोजी आमचा देश एका स्वतंत्र सार्वभौम देशात प्रवेश करत आहे.आमचा देश पूर्वी स्वतंत्र कधीच नव्हता,असं नाही तर ते स्वातंत्र्य आम्ही का गमावून बसलो याचा विचार गांभीर्याने आपण केला पाहिजे.
येणारे २६ जानेवारी १९५० चे सार्वभौम स्वातंत्र्य जर आम्ही पून्हा गमावून बसलो तर ते आम्ही पुन्हा कधीही मिळवून शकणार नाही.या कल्पनेनेच माझे काळीज चर्रर्रर्र होते आहे.”
— संविधान सभेतील २५ नोव्हेंबर १९४९ रोजीचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शेवटच्या भाषणाचा वरील सार….
“The dead Dr.B.R. Ambedkar is very dangerous than alive Dr. B.R. Ambedkar” (७ डिसेंबर १९५६ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या अत्यंविधीच्या वेळी वरील वक्तव्य एन.शिवराज यांनी केले.) – N. Shivraj
*****
आयोजकांचे मनोगत…
आम्ही भारताचे लोक तुमच्या “त्या कल्पनेला” आम्ही कधीच साकार करू देणार नाही.कारण तुम्ही आम्हाला जागे केले.आता झोपणार नाही.
जात, धर्म, पंथ, वर्ण या भेदांच्या भिंती ढासळवून तुम्ही निर्मिलेल्या संविधानावर देश चालविण्यास व्यवस्थेला आम्ही भाग पाडल्याशिवाय राहणार नाही.
जरी आजची व्यवस्था आरएसएसची (संविधान विरोधी शक्तीची) गुलाम झाली असली तरी या संविधानविरोधी शक्तीला आणि ईव्हीएम व मतचोरी या निवडणूक आयोगाच्या कुकृतीला कायमचे मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही.
या दृढ संकल्पाला कृतीच्या रूपाने सिद्ध होण्याची सुरूवात या ‘संविधान जनजागरण परिषदेतून करीत आहोत.आणि त्यासाठीच या संविधान जनजागरण परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे असे आयोजकांचे म्हणणे आहे.
*****
विशेष अतिथी….
संविधान परिषदेला अँड.के.ई.हरिदास,न्या.डी.आर.शेळके,डॉ.मच्छिंद्र गोर्डे,डॉ.ऋषीकेश कांबळे,साथी सुभाष लोमटे,डॉ.वासुदेव मुलाटे,कॉ.भीमराव बनसोड,प्रा.राम बाहेती,सुभाष महेर,प्रा.एच.एम.देसरडा,सुभेदार मेजर सुखदेव बन,अँड.एस.आर.बोदडे,डॉ.शेख इक्बाल मित्रे,अँड.वैशाली डोळस,सतिश चकोर,डॉ.प्रमोद दुथडे,इंजि.चंदशेखर शिखरे,इंजि.महेश निनाळे,डॉ.एन.जी.नरवडे,अँड.सुभाष सावंगीकर,बी.के.आदमाने,अँड.डी.व्ही. खिल्लारे,हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
******
आवाहनकर्ता….
संविधान परिषदेला यशस्वी करण्याच्या अनुषंगाने संभाजी नगर व संभाजी नगर जिल्ह्यातील सर्व बंधूंनी,नागरिकांनी,महिला भगिनींनी,जाणकार मंडळींनी,उपस्थित राहण्याचे आवाहन सर्वश्री रतनकुमार साळवे,कॉ.अभय टाकसाळ,डॉ.जनार्दन पिंपळे,डॉ.फारूक खान,अतकरे बापू,सविता अभ्यंकर,अरविंद खैरनार,रविंद्र तायडे,कॉ.मधुकर खिल्लारे,वसुधा कल्याणकर,दैवशाला गवंदे,डॉ.समाधान इंगळे,सुनिता शिंदे,इंद्रकुमार जेवरीकर,जितेंद्र भवरे,वजिर शेख,डॉ.धोंडोपंत मानवतकर,सुधाकर निसर्ग,भाऊ पठाडे,डॉ.अरूण कांबळे,ग.ह.राठोड,राजानंद सुरडकर,अन्वर शेख,बापुराव कांबळे,सतिश काळे,लिला ठोके,मधुकर गवंदे,शेख पाशुभाई,नौशाद उस्मान,डॉ. उमाकांत राठोड,रंजन दाणी,रवी वासाटे,नामदेव जिंदे,रमेश तेले आणि इतर सर्व आम्ही भारताचे लोक यांनी केले आहे.
*****
कार्यक्रमाचे मुख्य संयोजक….
*****
कार्यक्रमाची तारीख व स्थळ…
रविवार,दि. ७ डिसेंबर २०२५ ला,दुपारी १२:३० वाजता,”संविधान परिषदेला, सुरुवात होणार आहे.
संविधान परिषदेचे स्थळ,यशवंतराव चव्हाण नाट्यगृह,मसाप,रॉक्सी सिनेमाजवळ,पैठण गेट,छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) असे आहे.


