ब्रेकिंग न्युज… कन्हेरी येथील लग्नाला गेलेल्या युवकाची आत्महत्या? — गावात लोकचर्चेला उधाण हत्या की आत्महत्या?

दखल न्युज भारत

चिखलदरा तालुका

प्रतीनीधी

अबोदनगो चव्हाण

चिखलदरा

 

चिखलदरा

 चिखलदरा तालुक्यातंर्गत सोनू रामाजी कास्देकर वय 24 वर्ष हा युवक राहणार काटकुंभ येथील रहिवासी असून तो काल रात्रीच्या दरम्यान लग्नासाठी कन्हेरी गावात गेला होता.

     रात्री घरी परत आला नसल्यामुळे त्याच्या नातेवाईकांनी आज शोध घेतला.मात्र तो कन्हेरी गावानजीक शेत शिवारात हिरड्याच्या झाडाला लटकलेला दिसला व त्या ठिकाणी त्यांनी आत्महत्या केली असल्याचे दिसून आले.

       स्वतःच्या शर्टने त्याने गळफास घेऊन स्वतःचे जीवन त्याने संपविल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून मिळाली असून चिखलदरा पोलीस घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती आहे.

       चिखलदरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार राहुल वाढवे यांच्या मार्गदर्शनात चिखलदरा पोलीस तपास करीत आहेत.

       चिखलदरा पोलिसांनी मर्ग दाखल करून तपास सुरू केला आहे अशी माहिती चिखलदरा पोलिसांनी दिली आणि काटकुंभ पोलीस चौकी येथील जमादार संजय तायडे,निलेश तोटे पुढील तपास करीत आहेत.

         मात्र,सोनूने आत्महत्या केली की दुसऱ्यांनी त्याची हत्या करून झाडाला टांगवून ठेवले या संसयातंर्गत त्याच्या गावातील नागरिकांत खमंग चर्चा आहे.

        पण,शवविच्छेदन अहवालानंतर सोनूची आत्महत्या की हत्या हे समोर येणार आहे.