Home देशविदेश गरीब आणि श्रीमंत दोन्ही परावलंबीच…

गरीब आणि श्रीमंत दोन्ही परावलंबीच…

        गरीब वर्ग आणि श्रीमंत वर्ग हे दोन्ही पण स्वावलंबी नाहीत तर ते पर अवलंबित आहेत, असे असले तरी मात्र ते एकमेकांवर अवलंबून आहेत, याचा अर्थ गरीब वर्गावर श्रीमंत वर्ग अवलंबून आहे, म्हणजेच गरीब वर्ग आहे म्हणूनच श्रीमंत वर्ग आहे, याचप्रमाणे श्रीमंत वर्गावर गरीब वर्ग अवलंबून आहे याचा अर्थ श्रीमंत आहेत म्हणूनच गरीब आहेत. 

       परंतु या दोन वर्गाचे एकमेकावर असलेले अवलंबित्व यात परस्पर सहकार्यावर नसून विरोधावर अवलंबून आहे, कारण यातील मोठा वर्ग म्हणजे गरीब वर्ग असतो जो 75% असतो आणि छोटा वर्ग म्हणजे श्रीमंत वर्ग असतो जो 25% असतो, छोटा वर्ग हा मोठ्या वर्गाचे शोषण करीत असतो, पिळवणूक करीत असतो, म्हणजेच बहुजनाचे अभिजन हे शोषण पिळवणूक करीत असतात, केवळ शोषण आणि पिळवणूक म्हणजे आर्थिकच नव्हे तर सामाजिक आर्थिक धार्मिक राजकीय सांस्कृतिक सर्वच बाजूने मोठ्या वर्गाचे शोषण पिळवणूक हा छोटा वर्ग म्हणजे श्रीमंत वर्ग करीत असतो. तो त्यांचे श्रम वेळ पैसा धन याची चोरी करून छोटा वर्ग आर्थिक दृष्ट्या मोठा होतो, श्रीमंत वर्ग हा केवळ गरिबांचे आर्थिक शोषणच करीत नाहीत तर त्यांचेवर वर्चस्व गाजवितो, राज्य करतो, अन्याय अत्याचार पण करतो, गरिबांचे जिने हराम करतो, त्यांची छळवणूक पिळवणूक करतो, त्यांना जीवन जगणे कठीण करतो, छोटा वर्ग मोठ्या वर्ग नेहमीच आपल्यावर अवलंबून ठेवतो, परावलंबी बनवितो, त्यास देवाची आणि धर्माची भीती घालतो, पाप पुण्याचे आणि कर्माचे दैवाचे गणित मांडतो, हा सर्व खटाटोप करून छोटा वर्ग मोठ्या वर्गास कायमच दुबळा आणि दुर्बल करून ठेवतो. छोटा वर्ग म्हणजे श्रीमंत वर्ग हा पण स्वावलंबी असतो असे नाही, तर तो बहुजन वर्ग म्हणजे गरीब वर्ग म्हणजेच मोठ्या वर्गावर अवलंबून असतो, त्यांचे आर्थिक आणि सामाजिक शोषण करून मोठा होतो, याचा अर्थ हा वर्ग त्यांचे वर अवलंबून असतो, मोठ्या वर्गाचे शोषण केल्याशिवाय याचे जगणे कठीण होते, याची जीविका, याचे अस्तित्व, ह्याची वर्चस्व, याचे वैभव, याची चैन, याची आईस आरामी सर्व काही बहुजनावरच अवलंबून असते. व्याज नफा महागाई तस्करी काळाबाजार साठेबाजी अशा प्रकारचा गैरव्यवहार किंवा अशा प्रकारचे अवैध धंदे केल्याशिवाय याचे पोट भरत नाही, हा श्रीमंत होत नाही, म्हणजेच याचा अर्थ गरिबांचे अनेक मार्गाने शोषण करूनच श्रीमंत वर्ग हा आपले जीवन जगत असतो आणि त्यांचेवर त्यांच्याच प्रमाणे बुद्धीने आणि पैशाने त्यांच्यावरच राज्य करतो, वर्चस्व गाजवितो. म्हणून हा श्रीमंत वर्ग स्वावलंबी नसून परावलंबीच आहे, हे सिद्ध होते. 

   छोटा वर्ग नेहमीच विषमता निर्माण करीत असतो आणि तो टिकविण्याचा प्रयत्न करीत असतो, आर्थिक विषमता, सामाजिक विषमता, राजकीय विषमता, सांस्कृतिक विषमता अशी विषमतेची व्यवस्था टिकवून ठेवण्यामध्येच फायदा असतो त्याचा स्वार्थ असतो, यासाठी गरीब वर्ग हा छोटा असता कामा नये, तर तो मोठा असला पाहिजे, म्हणजेच गरिबांची संख्या ही बहुसंख्या असली पाहिजे, बहुसंख्यांकांच्या शोषणातूनच जास्तीत जास्त धन जमा करता येते, श्रीमंत म्हणजे सोशकवर्ग आणि गरीब म्हणजे शोषित वर्ग होय, मध्यमवर्ग पण शोषित वर्ग होय, गरीब वर्ग आणि मध्यमवर्गाचे शोषण करूनच श्री त्यातून श्रीमंत वर्ग निर्माण होत असतो, शोषण आहे म्हणूनच श्रीमंती आहे, आर्थिक शोषण जेव्हा संपेल तेव्हा श्रीमंत वर्ग संपेल, आणि गरीब वर्ग पण संपेल, असे होऊ नये म्हणून आर्थिक आणि सामाजिक विषमता कायम ठेवण्याचा प्रयत्न हा श्रीमंत वर्ग करीत असतो. कारण शोषणावरच त्याचे अस्तित्व टिकते आणि गरीब आणि मध्यमवर्गाचे अस्तित्व धोक्यात येते. किंवा कायम अडचणीत असते. 

     ही विषमतावादी व्यवस्था कायम टिकणे ही श्रीमंत वर्गाची गरज होऊन बसते, त्यासाठी त्यांना एक काल्पनिक विश्व निर्माण करावे लागते, काही काल्पनिक आणि निराधार म्हणजेच असत्य अशा काही गोष्टी निर्माण कराव्या लागतात आणि त्याचा प्रचार प्रसार करावा लागतो तरच त्यांचे अस्तित्व टिकून राहते, आर्थिक आणि सामाजिक विषमता टिकून राहते, म्हणजेच विषमतेची ही व्यवस्था कायम राहते, यासाठी देव धर्म पुनर्जन्म पूर्वक कर्म आणि त्याचे पाप पुण्य अशा काही भ्रमक काल्पनिक असत्यावर आधारित विज्ञान आणि शास्त्राच्या कसोटीवर न बसणाऱ्या काही गोष्टी म्हणजेच अंधश्रद्धा हा वर्ग निर्माण करीत असतो आणि त्याचा प्रचार प्रसार सतत करीत असतो अनेक माध्यमांच्या द्वारे म्हणजेच भजन कीर्तन शाहिरी कलापथक नाटक कथा कादंबऱ्या साहित्य प्रबोधन भाषण प्रवचन इत्यादी या मार्गातून या भ्रमक गोष्टी लोकांमध्ये बसविणे आणि त्यांच्या मेंदूत बसविणे हे त्यांचे कार्य चालू असते. 

    या विषमतावादी व्यवस्थेची गंमत अशी आहे की, या व्यवस्थेत गरीब मध्यम श्रीमंत असे तीन वर्ग असतात पण ते एकमेकावर अवलंबून असतात, एकमेकास पूरक नसतात, समुद्रात जसे मोठे मासे छोट्या माशांना खाऊन आपले जीवन जगतात, जंगलात जसे हिंस्र प्राणी अहिंसक प्राण्यांना खाऊन आपले जीवन जगतात, म्हणजेच बळी तो कानपिळी, म्हणजेच दुर्बलांचे सबलांनी शोषण करावे, त्यांची हिंसा करावी, त्यांच्यावर अन्याय अत्याचार करावे, काहीही करावे पण आपण मात्र स्वतः जिवंत राहावे, असे अनैतिक जीवन अ मानवी जीवन हे श्रीमंत वर्ग जगण्याचा प्रयत्न करीत असतात, त्यांची शिकार म्हणजे बहुजन पंच्याहत्तर टक्के गरीब वर्ग बनते आणि 25% असलेला हा श्रीमंत वर्ग हा बहुजनांचा शिकारी बनतो, असे बनवून ते आपले परस्परावलंबी जीवन म्हणजेच परावलंबी जीवन जगत असतात, विषमतेची ही व्यवस्था आणि अवस्था आणि परिस्थिती असते, या व्यवस्थेचे गरीब मध्यम श्रीमंत तिने वर्ग हे सभासद असतात. आणि विषमतेच्या ह्या जीवनाचे सर्व नियम पालन करीत असतात. शोषणाचे नियम, सोशकाने शोषिताचे केलेले शोषण आणि त्याचे तत्त्वज्ञान आणि नियम म्हणजे आचरण हे विषमतावादी व्यवस्थेचे जग असते. 

     परावलंबी जीवन जगणे म्हणजे भिक्षापात्र अवलंबने होय, गरीब वर्ग हा श्रीमंत वर्गाकडे भिक्षा मागतो, भीक मागतो, लाचारीने त्यांच्याकडे पाहतो, स्वाभिमान गमावतो, गुलामीचे जीवन जगतो, मध्यमवर्ग पण श्रीमंत वर्गावरच अवलंबून असतो कारण तो त्याच्या वर्चस्वाखाली काम करत असतो, श्रीमंत वर्ग हा मध्यमवर्गांचा मालक अधिकारी असतो, आणि मध्यमवर्ग हा नोकरच असतो, गरीब वर्ग हा श्रीमंताचा गुलाम असतो, तर मध्यमवर्ग हा श्रीमंतांचा नोकर असतो, अशी ही वही वाट विषमतेची आहे. समतेच्या विरोधी आहे. 

        विषमतावादी व्यवस्थेत गरीब मध्यम आणि श्रीमंत हे तिन्ही वर्ग एकमेकांवर अवलंबून आहेत, म्हणजेच परस्परावलंबी आहेत, श्रीमंत वर्ग हा गरीब वर्गाचे शोषण करतो आणि आपले जीवन जगतो याचा अर्थ हा वर्ग त्या वर्गावर अवलंबून आहे, ज्या दिवशी गरीब वर्ग संपुष्टात येईल तेव्हा श्रीमंत वर्ग पण संपुष्टात ये येईल आणि फक्त राहील तो मध्यम वर्ग म्हणजेच मध्यमवर्गीय समाज. समाजवादी व्यवस्था म्हणतात. पण ही समाजवादी व्यवस्था आणण्यासाठी आधी मालकी हक्काचे संरक्षण नाहीसे केले पाहिजे, मालकी हक्काला संरक्षण देऊन जर समाजवाद आणण्याची कुणी कल्पना करीत असेल तर ती केवळ कल्पनाच असेल, केवळ आदर्श वाद असेल, कारण मालक वर्ग म्हणजे श्रीमंत वर्ग म्हणजेच गरीबातील जरी कोणी घराचा शेताचा उद्योगाचा मालक असेल तरी तो मालक स्वतः समजून आणि तो श्रीमंताचीच बाजू घेईल आणि श्रीमंती टिकवण्यासाठी मदत करेल, म्हणजेच मालकी हक्क असलेला गरीब माणूस पण समतेला विरोधच करील, म्हणून समाजवाद आणणे कठीणच जाईल, जवळजवळ ते शक्यच होणार नाही, असे काही प्रयत्न जगातील काही देशात झाले, ते असफल ठरले ते केवळ याच कारणामुळे. 

    माणसाच्या जीविताची आणि जीवन जगण्याची हमी सरकारने जरूर घ्यावी परंतु माणसाकडे मालकी हक्क ठेवून त्याच्या जीविताची आणि त्याच्या मालमत्तेची आणि त्याच्या संरक्षणाची आणि भरणपोषणाची जिम्मेदारी सरकारने घ्यावी, हा विचार विसंगत आहे, चुकीचा आहे, अ व्यवहारी आहे. यापेक्षा नैसर्गिक साधन संपत्ती सर्व समाजाची म्हणजेच सरकारची आणि मालकी हक्क हा सरकारचा च असे धोरण ठेवले तर, मात्र आर्थिक समता आणि सामाजिक समता प्रस्थापित व्हायला मदत होईल, आली वर्ग निर्माण होणार नाहीत, ते एकमेकावर अवलंबून राहणार नाहीत, सशक्त हा अशक्ताचे शोषण करणार नाही, शासक शोषित आणि सोशक असा वर्ग राहणार नाही, तर परावलंबन हे तत्त्व नष्ट होऊन परस्पर सहकार्य सहकार्यातून परस्परावलंबन या तत्त्वाची निर्मिती होईल, परस्पर सहकार्य आणि परस्परावलंबन या दोन तत्त्वामुळे समाज आणि समाजातील व्यक्ती एकमेकाकडे सहानुभूतीने प्रेमाने सौहार्दपणे एकमेकाचा आदर या विचाराने आणि भावनेने एकमेकांशी व्यवहार करतील, अशा व्यवहाराने शोषण पिळवणूक अन्याय अत्याचार भ्रष्टाचार काळाबाजार हिंसा अशा गोष्टीला संदेश मिळणार नाही म्हणजेच अशा सर्व गोष्टी आपोआप संपुष्टात येतील. 

      विषमतावादी व्यवस्थेत गरिबा श्रीमंतावर अवलंबून असतो आणि श्रीमंत गरिबावर अवलंबून असतो. एकमेकांवर अवलंबून असण्याची ही व्यवस्था म्हणजेच गुलामीची व्यवस्था होय, बांडगुळ व्यवस्था होय. यात शोषण अन्याय अत्याचार भयानक असतो यामुळे श्रीमंत वर्गाची पण झोप नष्ट होते शांती नष्ट होते आणि गरीब वर्गाची पण झोप आणि शांती नष्ट होते, म्हणजेच अशी व्यवस्था ही सर्वच वर्गाला हानिकारक आहे, एकाने दुसऱ्यावर अवलंबून राहणे किंवा एका समूहाने दुसऱ्या समूहावर अवलंबून राहणे म्हणजेच स्वाभिमान गमावणे आहे, भिक्षापात्र अवलंबणे आहे, तुकाराम महाराजांनी सांगितले की,”भिक्षापात्र अवलंबिणे, जळो जीने त्याचे लाजीरवाणे”.

              लेखक

             दत्ता तुमवाड

         सत्यशोधक समाज नांदेड

दिनांक : 16 फेब्रुवारी 2026, फोन : 9420912209.