खासदार अशोक जी नेते यांच्या नेतृत्वात सावली तालुक्यातील मौजा – हिरापुर येथे अनेकांचा भाजपामध्ये पक्षप्रवेश… — भाजपाचे ज्येष्ठ नेते दौलत भोपये,विलास खरवडे,माजी जि.प.सदस्या मनिषा चिमूरकर यांच्या विश्वासावर पक्ष प्रवेश…

     सुधाकर दुधे

सावली तालुका प्रतिनिधि 

            तालुक्यातील मौजा- हिरापुर येथे भारतीय जनता पार्टी तालुका सावली च्या वतीने दिनांक १५ फेब्रुवारी २०२४ रोज गुरूवार ला गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक जी नेते यांच्या नेतृत्वात विश्वास ठेवून शेकडोंत भगवा भाजपाचा दुपट्टा टाकून अनेक महिला व युवक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष प्रवेश केला.

           या पक्ष प्रवेशात हिरापुरचे भाजपा ज्येष्ठ नेते दौलत भोपये,विलास खरवडे व माजी जि.प.सदस्या मनिषा चिमूरकर यांच्या विश्वासावर पक्ष प्रवेश करण्यात आले.

             यावेळी खासदार अशोक नेते यांनी बोलतांना देशाचे लोकप्रिय पंतप्रधान विश्वगौरव श्री.नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वाखाली भारत शक्तिशाली देश बनत असून आत्मनिर्भरतेच्या दिशेने एक एक पाऊल आत्मविश्वासाने टाकत आहे, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी आणि विकासाचा ध्यास असलेले राज्यातील नेतृत्व माननीय उपमुख्यमंत्री ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस व ना.श्री.सुधिरभाऊ मुनगंटीवार मंत्री वने,सांस्कृतिक कार्य,मत्स्य व्यवसाय,तथा पालकमंत्री म.रा. यांच्या कार्यकर्तृत्वावर व विकसनशील ध्येय धोरणांवर विश्वास ठेवून भाजपात पक्षप्रवेश केला. यावेळी खासदार अशोक नेते यांनी सर्वांच्या गळ्यात भाजपाचा भगवा दुपट्टा टाकून पक्षात सहर्ष स्वागत केले व पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 

             याप्रसंगी प्रामुख्याने लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे, तालुकाध्यक्ष अविनाश पाल, ता.महामंत्री तथा नगरसेवक सतिश बोम्मावार,माजी बांध. सभापती संतोष भाऊ तंगडपलीवार, कोषाध्यक्ष अर्जुन भोयर, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष प्रकाश पा.गड्डमवार,भाजपा जेष्ठ नेते अरूण पाल,ओबीसी नेते कविंद्र रोहणकर,दलीत आघाडीचे नेते लोकनाथ रायपूरे,ज्येष्ठ नेते दौलत भोपये,विलास खरवडे,माजी सभापती कृष्णा भाऊ राऊत, महिला मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीस निलमताई सुरमवार, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष पुष्पाताई शेरकी,माजी जि.प.सदस्या मनिषाताई चिमूरकर,माजी पं.स. सभापती छायाताई शेंडे, महिला नेत्या प्रतिभाताई बोबाटे, शोभाताई बाबनवाडे,युवा नेते मोतीराम चिमूरकर,युवा नेते अंकूश भोपये, तसेच युवक कार्यकर्ते व नागरिक बंधू भगिनीं उपस्थित होते.