अखंड भारताच्या इतिहासाचा अभ्यास केल्यानंतर असे आढळून येते की, हिमालयापासून ते कन्याकुमारी पर्यंत आपले राज्य प्रस्थापित करणारे जे राजे होते ते त्यांना चक्रवर्ती राजे असे म्हटले गेले आहे. चक्रवर्ती राजा किंवा सम्राट राजा म्हणजे अनेक राजांचे राज्य जिंकून त्यांना आपले मांडलिकत्व मान्य करायला लावणे, आणि आपला राज्यकारभार चालविणे.
अखंड भारत बनविण्यात राजा भरत, राजा विक्रमादित्य, राजा अशोक सम्राट, अकबर बादशहा, औरंगजेब बादशहा, इंग्लंडची एलिझाबेथ राणी यांचा प्रयत्न झालेला दिसतो, एलिझा बेत राणीच्या नंतर भारतात लोकशाही संग्राम म्हणजेच राष्ट्रीय स्वातंत्र्य संग्राम काँग्रेसच्या नेतृत्वाखाली झाला, इंग्रजांच्या अधिपत्याखालील भारत राष्ट्रीय काँग्रेसला सपोर्ट करण्यात आले, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने लोकशाही जाहीर केली, लोकशाहीचे संविधान स्वीकारले, त्यानंतर भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी इंग्रज सत्तेचे मांडलिक असलेले 560 संस्थानिक स्वतंत्र होते जे स्वतंत्र भारतात विलीन झालेले नव्हते किंवा त्यांची तशी इच्छा नव्हती तरी सरदार पटेल यांनी काही लोकांना समज देऊन आणि काही संस्थानिकांवर सैनिकी कारवाई करून सारी संस्थाने अखंड भारतात विलीन केली. अशाप्रकारे आजचा भारत देश हा अखंड देश म्हणून जगाच्या नकाशावर नोंदला गेला.
चक्रवर्ती सम्राट अशोकाच्या काळात अखंड भारत यापेक्षाही विस्तारित आणि व्यापक होता, जात पाकिस्तान बांगलादेश नेपाळ अफगाणिस्तान अशी आजच्या भारताला लागून असलेली सर्व राष्ट्र अखंड भारताचाच एक भाग होती, ज्यात सिंधू आणि द्रविड संस्कृती चा समावेश होता, ही सिंधू संस्कृती म्हणजेच हिंदू संस्कृती होय, हिंदी किंवा हिंदू संस्कृती पूर्वीच्या अखंड भारतात होती आज नाही ती परत निर्माण करण्याच्या दृष्टीने आर एस एस आणि हिंदू महासभेचे स्वप्न आहे. 21 व्या शतकात धर्म स्वातंत्र्य आणि संस्कृती स्वातंत्र्याच्या विचाराच्या विश्वाने ते स्वप्न साकार होणे शक्य नाही, वास्तविक स्वप्न पाहणे कधीही हितकारक आणि व्यवहारी असते, जे स्वप्न व्यवहारात उतरते तेच खरे असते अन्यथा ते स्वप्नच असते, त्याचे भान विचार करणाऱ्यांना असले पाहिजे.
प्राचीन अखंड भारत आणि आधुनिक अखंड भारत यातील प्राचीन अखंड भारताचे स्वप्न आज आरएसएस पाहत आहे, ते चुकीचे जरी नसले तरी, ते स्वप्न साकार करण्याकरिता त्यांनी धर्म ह्या शस्त्राचा वापर करण्याचे ठरविलेले असल्यामुळे प्राचीन अखंड भारताचे स्वप्न हे कधीच साकार होऊ शकत नाही, उलट असलेला आधुनिक अखंड भारत तो खंडप्राय होईल म्हणजेच असलेल्या भारताचे सुद्धा धर्माच्या कसोटीवर तुकडे पडतील, असलेला अखंड भारत हा अखंड राहणार नाही, कारण भारतातील अनेक धर्म आर एस एस च्या विचाराप्रमाणे आपापल्या धर्माचे स्वतंत्र राज्याची मागणी करतील, असे झाले तर अखंड भारत राहणार नाही, ही वस्तुस्थिती भारतीय मनाला समजणे आवश्यक आहे, विशेषतः प्राचीन अखंड भारताचे स्वप्न पाहणाऱ्यांना ही वस्तुस्थिती लक्षात घेणे आवश्यक आहे, असे मला वाटते, असे वाटणे म्हणजे सुद्धा एक राष्ट्रीय भावना आहे, त्याचा पण सहानुभूतीने विचार होणे जरुरीचे आहे.
भारतात राहणारे कोणीही कोणीही जातीचे आणि धर्माचे किंवा कोण्याही संस्कृतीचे जरी असले तरी ते त्यांचे पुरोजापासून इथे वास्तव्य करून राहिलेले आहेत, आणि इंग्रजांकडून राज्य घेण्यासाठी जो राष्ट्रीय स्वातंत्र्याचा लढा झाला त्यात सर्वच जातीच्या धर्माच्या आणि संस्कृतीच्या लोकांनी सहभाग नोंदविलेला आहे त्यामुळे आजचा भारत देश हा एका धर्मे यांचा नसून सर्वच धर्मियांचा त्यांच्या हक्कांचा त्याच्या हक्काचा मालकीचा झालेला आहे, हा इतिहास आणि हे वास्तव लक्षात घेणे जरुरीचे आहे, हा समजत हा समजूतदारपणा जर आरएसएस आणि हिंदू महासभेने आणि भारतीय जनता पक्षाने दाखविला तर तरच अखंड भारत राहील अन्यथा तुम्हीच भारताचे तुकडे केल्यासारखे होईल, हे पाप आपण आपल्या पदरात घेऊ नये, असे मला वाटते, कदाचित माझे हे वाटणे चुकीचे असेल तर मला कोणीही दुरुस्त करावे, म्हणजे माझे हे विचार चुकीचे असतील तर ते दुरुस्त करावे, त्याची मी स्वागतच करेल.
आता आपण” एकसंघ भारत “या विषयावर चिंतन करूया,
देश म्हणजे केवळ देशाचा भूगोल नव्हे तर देशातील माणसे देशातील समाज हा सुद्धा देश ह्या संकल्पनेत येतो, आणि भौगोलिक देश आणि त्याच्या सीमा तरी कशासाठी ? तर देशात राहणाऱ्या लोकांसाठीच ना ? त्यांच्या भरणपोषणासाठी आणि संरक्षणासाठीच ना ? आणि असे असेल, म्हणजेच देश हा देशातील लोकांसाठी असेल, तर देशातील सर्वच जातीच्या आणि धर्माच्या आणि संस्कृतीच्या लोकांना जेव्हा स्वतःच्या अस्तित्वाबद्दल खात्री होईल त्यांना स्वसंरक्षणाची खात्री होईल स्वदर भरण्याची खात्री होईल तेव्हाच त्यांना हा आपला देश वाटायला लागेल, अन्यथा त्यांना आपण ज्या देशात राहतो तो देश आमचा नव्हे असेच वाटायला लागेल, देशात जर अन्नसुरक्षा नसेल, आरोग्य सुरक्षा नसेल, शिक्षण सुरक्षा नसेल, कामाची गॅरंटी नसेल, सुरक्षितता नसेल, शांतता नसेल, देशात समृद्धी नसेल तर लोक या देशात गुदमरून मरतील किंवा परदेशात निघून जातील, या दिशा विषयी प्रेम अस्मिता जिव्हाळा आपुलकी ममता काहीच राहणार नाही, अशी परिस्थिती निर्माण होणे किंवा देशातील जनतेची अशी मानसिकता निर्माण होणे हे राष्ट्रासाठी नवे देशासाठी घातक आहे, आणि या सर्व समस्या दूर होतील किंवा दूर करण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे राजकर्त्यांकडून केल्या जात आहे याबद्दलचा विश्वास जनतेत जेव्हा निर्माण होईल, त्याबरोबरच जातीय सलोखा, सर्वधर्मसमभाव, आणि सरकारचे धर्मनिरपेक्ष धोरण हा त्रिसूत्री कार्यक्रम जोपर्यंत राबविण्यात येणार नाही तोपर्यंत देशातील जनतेला देशाविषयी प्रेम आणि असता वाटणार नाही,
कोणताही देश ” राष्ट्र “या कसोटी ला तेव्हाच उतरतो, जेव्हा त्या देशातील जनतेला त्या देशात त्यांचे अस्तित्व निर्माण होईल, त्यांना मानवी हक्क आणि अधिकार प्राप्त होतील, स्वातंत्र्य समता बंधुत्व न्याय प्रस्थापित होईल, तेव्हाच देशाचे रूपांतर राष्ट्रात होईल किंवा होत असते. भारत हा देश तर आहेच परंतु राष्ट्र पण बनला पाहिजे, भारत देशाचे भारत राष्ट्र जोपर्यंत बनणार नाही, तोपर्यंत एकसंघ भारत निर्माण होणार नाही, आणि जोपर्यंत एकसंघ भारत निर्माण होत नाही तोपर्यंत अखंड भारता भारत निर्माण होणार नाही, ही वस्तुस्थिती वास्तविकता हे सत्य समजून घेण्याची आजची काळाची गरज आहे.
सामाजिक समरसता निर्माण केल्याने माणसाची तहान भागेल परंतु भूक भागणार नाही, हेही तेवढेच खरे आहे. माणसाची भूक भागवायची असेल तर म्हणजे मानसिक भूक भागवायचे असेल तर, आपणास सामाजिक समरसते ऐवजी सामाजिक समताच प्रस्थापित करणे आवश्यक आहे, सामाजिक समता याचा अर्थ जाती विरहित समाज रचना निर्माण करणे, आणि आर्थिक समता याचा अर्थ वर्ग विरहित समाज रचना निर्माण करणे होय. आपल्या देशाला आर्थिक विषमतेचा म्हणावा तेवढा अखंड भारताला धोका नाही, मात्र सामाजिक विषमतेचा नक्कीच आपल्या अखंड भारताला धोका आहे, हे समजून घेतल्याशिवाय आपले अखंड भारताचे स्वप्न साकार होणार नाही. अखंड भारत हा एकसंघ भारत म्हणजेच राष्ट्र यावर अवलंबून आहे, हे ध्यानात घेण्याची गरज आहे. यासाठी भारत देशाचे आधी राष्ट्र बनवूया, म्हणजेच एक संघ भारत बनवूया, म्हणजेच सामाजिक समता प्रस्थापित करूया, असे झाले की अखंड भारताला काहीच धोका निर्माण होणार नाही याची गॅरंटी मी देतो, यासाठी जात आंधळेपणा आणि धर्मांधता नष्ट करणे जरुरीची आहे, धर्म हा एकमेकांशी भांडण्यासाठी नसून नैतिकतेच्या मार्गावर नेणारा तो एक पंत आहे हे आपणास समजल्याशिवाय आपण सर्वधर्मसमभावाची कास धरणार नाही, आणि जनते ची भावना सर्वधर्मसमभावाची असली पाहिजे, आणि सरकार चे धोरण धर्मनिरपेक्ष असले पाहिजे, लोकशाहीचे असले पाहिजे, सार्वभौमत्वाचे असले पाहिजे अशी परिस्थिती किंवा माहोल आपल्या देशात जेव्हा निर्माण होईल तेव्हाच अखंड भारताला निर्माण झालेला धोका नाहीसा होईल.
आज मला आपल्या देशाविषयी चिंता वाटते आहे एक नागरिक म्हणून तीही की, सरकारच जर हिंदू राष्ट्राची मागणी करीत असेल तर, इतर धर्माचे लोक पण त्यांच्या धर्माच्या राष्ट्राची म्हणजेच अखंड भारतात मुस्लिम राष्ट्र ख्रिश्चन राष्ट्र बौद्ध राष्ट्र असे झाले तर भारत अखंड राहणार नाही तर भारताचे तुकडे तुकडे होतील, आणि जगाच्या नकाशावरील भारत दिसणार नाही शिवाय भारत हा विश्वगुरू होऊ शकणार नाही, जगात भारत हा एक अशक्त दुर्बल विघटित मरणप्राय देश जगाच्या नजरेसमोर येईल, हे चिंता प्रत्येक भारतीयांनी भारताचा एक मतदार किंवा मी एक नागरिक म्हणून करणे अत्यंत आवश्यक आहे, आणि महत्त्वाचे म्हणजे ही चिंता आजचे भाजपाचे सरकार आणि स्वतः सामाजिक संघटना किंवा सांस्कृतिक संघटना म्हणून घेणारी आरएसएस संघटनेने या गोष्टीचा फेरविचार करणे अत्यंत आवश्यक आहे. मी एक चिंतनशील नागरिक म्हणून या सरकारला आणि या आरएसएस संघटनेला कळकळीची विनंती करतो की, महत्प्रयासाने आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेला अखंड भारत हा अखंड भारत च असू द्या. आपल्या पूर्वजांचे स्वप्न धुळीस मिळवू नका.
लेखक : दत्ता तुमवाड
सत्यशोधक समाज नांदेड
दिनांक 15 डिसेंबर 2025, फोन : 9420912209.



