Home Maharashtra वृध्द कलावंतांचे प्रस्तावित अर्ज मंजूर केले जातील काय? — केलेले अर्ज...

वृध्द कलावंतांचे प्रस्तावित अर्ज मंजूर केले जातील काय? — केलेले अर्ज कचरापेटीत टाकले जाणार याची दक्षता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः घ्यावी अशी वृध्द कलावंतांची त्यांना विनंती.

  उपक्षम रामटेके 

मुख्य कार्यकारी संपादक 

     महाराष्ट्र शासनाच्या राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व कलावंत यांना मानधन योजना अंतर्गत,कला आणि साहित्य क्षेत्रात भरीव योगदान दिलेल्या ज्येष्ठ कलावंतांना त्यांच्या वृद्धापकाळात आर्थिक सहाय्य म्हणून मासिक मानधन दिले जाते.

       ज्यात वयाची अट (५०+), उत्पन्नाची मर्यादा (₹४८,०००/वर्ष) आणि इतर निकषांची पूर्तता करणे आवश्यक आहे.यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालय व जिल्हास्तरीय समित्या अर्ज तपासतात व पात्र कलाकारांची निवड करतात,ज्यामुळे त्यांना सन्मानपूर्वक जगता येते.

          ग्रामीण भागातील ज्या पुरुष व महिला कलावंतांनी १५ ते ३० वर्षे कला क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे.त्यांनी जिल्हास्तरीय समित्यांकडे अर्ज दाखल केलेली आहेत.

          मात्र,जिल्हा समितीचे पदाधिकारी हे कलावंतांचे अर्ज पात्र ठरवताना नियमाला आणि अर्ज दाखल दिनांक व वर्षाला महत्व देत नसल्याचे वास्तव पुढे आले आहे.

         तद्वतच राजकीय पक्ष व सत्ताधारी राजकीय पक्षातील संबंध बघून वृध्द कलावंतांचे अर्ज पात्र ठरविण्याची कार्यपद्धत जिल्हास्तरावर रुढ झाली असल्याने ग्रामीण भागातून अर्ज सादर केलेल्या गोरगरिब कलावंतावर जिल्हा निवड समिती अन्याय करीत असल्याचे अनेक उदाहरणे आहेत.

           कला आणि साहित्य क्षेत्रात आयुष्य वेचलेल्या ज्येष्ठ कलावंतांना आर्थिक मदत देणे.वृद्धापकाळात त्यांना आर्थिक अडचणी येऊ नयेत म्हणून आधार देणे हे योजणेचे महत्त्वपूर्ण उदिष्ट आहे.

         पात्रतेच्य निकषाप्रमाणे कलावंताचे (अंदाजे)

वय ५० वर्षे किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक आहे.साहित्य किंवा कला क्षेत्रात किमान १५-२० वर्षांचे महत्त्वपूर्ण कार्य आवश्यक आहे.तर वार्षिक उत्पन्न ₹.४८ हजार पेक्षा जास्त नसावे.तद्वतच शासनाच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ सदर कलावंतांना मिळत नसावा हि अट सुध्दा आहे.

          वृद्ध कलावंत मानधन योजना (राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजना) ही महाराष्ट्र शासनातर्फे चालवली जाते,ज्या अंतर्गत कला आणि साहित्य क्षेत्रात योगदान दिलेल्या गरजू आणि वृद्ध कलावंतांना दरमहा ₹.5000/- मानधन दिले जाते.

         यासाठी ‘आपले सरकार’ पोर्टल वर अर्ज करता येतो,आणि निवड जिल्हा निवड समितीमार्फत होते.कला आणि साहित्य क्षेत्रात सक्रिय असलेले,त्यांची उपजिविका पूर्णपणे या क्षेत्रावर अवलंबून असणे,आवश्यक आहे.

             कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता मानधन लाभासाठी अर्ज केलेल्या प्रत्येक वृध्द कलावंतांचे अर्ज पात्र ठरवून त्यांना दिलासा देण्याचे काम सांस्कृतिक कार्य मंत्री महाराष्ट्र राज्य,सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य व संबंधित विभागाचे आणि जिल्हा निवड समितीचे आहे.

           ज्या वृध्द कलावंतांनी नियमानुसार अर्ज दाखल केले आहेत,त्या सर्वांना महाराष्ट्र सरकारचे सांस्कृतिक कार्य मंत्री ना.आशिष शेलार हे दिलासा देतील अशी त्यांना अपेक्षा आहे.

            मानधन लाभासाठी अर्ज करण्यासाठी कलावंतांना बरीच कसरत करावी लागत असल्याने त्यांचे अर्ज हे कचऱ्याच्या टोपलीत जाणार नाही याची दक्षता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावी अशी विनंती वृध्द कलावंतांची त्यांना आहे.