उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक
नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुका अंतर्गत राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी यांची व मित्रपक्षांची युती होण्याची दाट शक्यता आहे.
याचबरोबर जुनेद खान हे काॅंग्रेसवासी झाले.जुनेद खान हे निवडणुकीतील चाणक्य म्हटल्या जाते.ते चिमूर येथील रहिवासी आहेत व त्यांचे सासुरवाड नागभिड आहे.या दोन्ही ठिकाणी त्यांची मतदारांवर पकड आहे.
यामुळे आता चिमूर आणि नागभिड नगरपरिषद निवडणुकीत अतितटीचा संघर्ष बघायला मिळणार आहे.काही मतदार हे इमानदार असल्याने समिकरणे बदलवणारे असतात हे विसरून चालता येणार नाही.
तद्वतच आमदार किर्तीकुमार भांगडीया आणि माजी जिल्हा परिषद सदस्य गजानन बुटके यांचा विकोप हा जातीय समीकरणातंर्गत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या बाजूने असणार आहे.
एका ओबीसी नेत्याला त्याच्या घरी जाऊन मारणे हा प्रकार चिमूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपाच्या अंगलट येवू शकतोय.
विकासाचे लालीपाप,रुपया आणि सत्ता या बलावर भाजपा चढाओढ करेल.पण,चिमूर आणि नागभिड येथील मतदारांनी ठरवले तर रुपया,लालीपाप आणि सत्ता याला बळी न पडता ते नगरपरिषदेची सत्ता पालटवू शकतात हे तितकेच खरे आहे.
राज्यात सत्ता कुणाचीही असली तरी सत्तेकडे झुकते माप न देणारे मतदार बघितले आहेत.”गावातली सत्ता आमची सत्ता,आम्ही आमच्या गावातील राजे आहोत असे मतदारांनी ठरवले तर सत्ताधाऱ्यांना हादरे देण्याचे काम मतदारच करतात हे नवीन नाही.
भिसी नगरपंचायत निवडणुकी अंतर्गत वंचित बहुजन आघाडी-राष्ट्रीय काँग्रेस पक्ष,शिवसेना (उबाठा),हे एकत्रित आले तर इथे भाजपाची दाळ गढणार नाही हे स्पष्ट आहे.
जातीय समीकरणात एससी,एसटी,ओबीसी समाज घटकातील भरीव मतदार बघता भिसीचा कल हा भाजपाकडे राहणार नाही असे दिसून येते आहे.
पण,चिमूर विधानसभा निवडणुकीत भरमसाठ रुपयाचा उपयोग करण्यात आला होता.विधानसभा निवडणूकीत मतदारांना उघड उघड रुपये देण्यात आले होते,त्याची पुनरावृत्ती झाली तर मतदारांसाठी शरमेची बाब ठरेल…
विकाऊ मतदार हे लोकशाहीचे मारेकरी असतात,म्हणजेच स्वतःच्या अस्तित्वाचे व स्वतःच्या अधिकाराचे मारेकरी असतात आणि स्वतःला कलंकित करणारे असतात हे भारत देशातील मतदारांना अजूनही कळत नाही हेच सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियांचे दुर्दैव आहे…
निवडणूक नियमानुसार,सार्वत्रिक निवडणुका होत नसल्याने,निवडणूक प्रक्रिया राबणारे निवडणूक आयुक्त व निवडणूक अधिकारी तितकेच भ्रष्टाचार यंत्रणेला जबाबदार असतात हे वास्तव आहे…



