मोफत डोळे तपासणी शिबिराच्या आयोजनासह पिंपळगांव येथे जनहितार्थ मोफत चष्मे वाटप उपक्रम.. — ७४ चिमूर विधानसभा समन्व्यक डॉ सतिश वारजूकर यांच्या हस्ते उदघाट्न संपन्न..

 

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे 

       वृत्त संपादीका 

           आमदार ब्रम्हपुरी विधानसभा निर्वाचन क्षेत्र तथा महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेते ना.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या वतीने आज चिमूर विधानसभा क्षेत्रातील ब्रम्हपुरी तालुकातंर्गत मौजा पिंपळगांव येथे मोफत डोळे तपासणी शिबिराच्या आयोजनासह जनहितार्थ मोफत चष्मे वाटप करण्याचा उपक्रम राबविण्यात आला.

           या जनहितार्थ उपक्रम शिबिराचे उदघाट्न ७४ चिमूर विधानसभा क्षेत्राचे समन्व्यक तथा उपाध्यक्ष ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश डॉ. सतिश वारजूकर यांच्या हस्ते संपन्न झाले.

          या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य स्मिता पारधी,ब्रम्हपुरी शहर अध्यक्ष योगिता आंमले,चिमूर तालुका कांग्रेस कमिटी अध्यक्ष डॉ. विजय गावंडे पाटील,तालुका अध्यक्ष किसान सेल वामन मिसार,सरपंच सुरेश दुणेदार,उपसरपंच जगदीश बनकर,कांग्रेस कार्यकर्ते गड्डू बगमारे,कपिल राऊत,दादाजी मिसार,अनिल शेबे, माजी सरपंच जयपाल पारधी,उत्तम ठेंगरी,प्रभाकर दोनाडकर,व कांग्रेस कार्यकर्ते व गावकरी उपस्थित होते.