आळंदीत शिवसेनेच्या वतीने वाचन प्रेरणा दिवस साजरा…

दिनेश कुऱ्हाडे

उपसंपादक

आळंदी: भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी.जी अब्दुल कलाम यांचा जन्म दिवस वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. याअनुषंगाने शिवसेना शहरप्रमुख राहुल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आळंदी शहर शिवसेनेच्या वतीने श्री रामकृष्ण वारकरी शिक्षण संस्थेते वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन केलेले आहे.

        सदर वाचन प्रेरणा दिनानिमित्त माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आले. यावेळी शिवसेना शहरप्रमुख राहुल चव्हाण, हभप मोहन महाराज शिंदे, अर्जून मेदनकर, महादेव पाखरे, सचिन शिंदे तसेच संस्थेतील विद्यार्थी उपस्थित होते.

          आपले मनोगत व्यक्त करतांना मोहन महाराज शिंदे यांनी सांगितले की, वाचनाची आवड असलेले कित्येक लोक आपल्या आयुष्यात यशस्वी झालेले आहेत. आपल्या घरात देखील वाचनाचे वातावरण असले पाहिजे, यामुळे आपल्या मुलांमध्ये देखील चांगले संस्कार निर्माण होतात. कलामांच्या जयंतीनिमित्ताने वाचनसंस्कृतीचा हा जागर अधिक उर्जस्वल होईल, अशी आशा करूया.