जेतवन बुद्ध विहार मालेवाडा येथे ६७ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा..

 

      रामदास ठुसे 

विशेष विभागीय प्रतिनिधी 

चिमूर:-

         तालुक्यातील जेतवन बुद्ध विहार,मालेवाडा येथे “धम्मचक्र प्रवर्तन दिन ” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी गावातिल मुख्य रस्त्याने महाकारुनिक तथागत भगवान गौतम बुद्ध,बोधिसत्त्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर,चक्रवर्ती सम्राट अशोक महान यांच्या प्रतिमांसह मिरवणूक (रॅली) काढण्यात आली. 

         शांतिचा संदेश देत,क्रोधाला प्रेमाने,पापाला सदाचाराने,लोभाला दानाने आणि असत्याला सत्याने जिंकता येते असा संदेश देणार्‍या तथागत गौतम बुद्धांचा धम्म स्वीकारून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९५६ साली इतिहास केला. 

         बुद्ध विचारांचे बीज पेरत बुध्दम शरणंम गछामी,धम्मम शरणंम गछामी,संघम शरणंम गछामीचा निनाद,एका हातात महापुरुषांच्या सुविचाराचा फलक तर दुसऱ्या हातात मेणबत्ती घेत जयघोष करत निघाली व विहाराचे प्रांगणात मिरवणुकीची सांगता करण्यात आली.

           त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान गौतम बुद्ध यांचे प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली. 

           याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष आयु. जगदीश आनंदराव रामटेके(अध्यक्ष, बौध्द पंच कमेटी) व प्रमुख पाहुणे श्री. चरणदास पोईनकर, काशिनाथ गजभिये, सिद्धार्थ मेश्राम, ईश्वर ठवरे, गंगाधर गजभिये, मारोती बहादुरे, विनोद बोरकर, आयु. कुसुमताई बोरकर, आशाताई चव्हाण आदी. मान्यवर उपस्थित होते.

           या प्रसंगी,”अखिल भारतीय धम्म ज्ञान परीक्षा – २०२३,चा निकाल जाहीर करण्यात आला.जुनिअर गटातील प्रथम क्रमांक आलेल्या कु. लक्ष्मी भास्कर नरुले व सिनिअर गटातील प्रथम क्रमांक आलेल्या श्री.महेश तुळसीराम नन्नावरे यांचे आयु.शकुंतला प्रकाश मेश्राम व मान्यवरांचे हस्ते शाल आणि भ. बुद्ध व बाबासाहेबांचे पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला.

           आयु.सत्यफुलाबाई चव्हाण,जानवी गजभिये,रोहित शेंडे,प्रज्वल शेंडे यांना परीक्षेतील विशेष गुण मिळविल्याबद्दल ग्रंथ भेट देऊन गौरविण्यात आले.

          कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन आशिक रामटेके यांनी केले तर आभार प्रदर्शन विनोद बोरकर यांनी केले.

          समाजिक सहभोजनानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली,यात तरुणांनी उल्लेखनीय योगदान केल.याप्रसंगी समस्त बौध्दजन तथा गावकरी उपस्थित होते.