धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधुन बौद्ध समाज कोअर कमेटी सदस्यांकडुन दिव्यांग विद्यार्थ्यांना भोजनदान…

ऋषी सहारे

संपादक

देसाईगंज –

  बौध्द समाज कोअर कमेटी च्या माध्यमातुन दिक्षाभुमीवर येणाऱ्या बौद्ध बांधवांना भोजनदान करण्यात आले. आज याच कार्यक्रमाचे औचित्य साधुन बौद्ध समाज कोअर कमेटी च्या महिला उपाध्यक्षा अनिता मेश्राम यांनी पार्वती निवासी मतिमंद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना बिस्किट वाटप तर आशा दहिवले , खुशबु केशव दहिवले, पल्लवी अनुराग बोरकर, भावना प्रशांत बोरकर यांनी गोड वस्तु आणि मसाला भात वितरित करुन दान पारमिता पुर्ण केली.

          या प्रसंगी बौद्ध समाज कोअर कमेटी चे मुख्य सल्लागार विजय बन्सोड, डाकराम वाघमारे, राजरतन मेश्राम, ॲड.मंगेश शेंन्डे , कमेटी अध्यक्ष प्रकाश सांगोळे, कार्याध्यक्ष भिमराव नगराळे, कोषाध्यक्ष सुरज ठवरे, सुनिल सहारे, मारोती रामटेके, बंडु तांबे, भिमराव ठवरे, उषाकिरण बन्सोड, निर्मला रामटेके यांचेसह कमेटी सदस्य उपस्थित होते.