Home Vidarbha नयाकुंड आदर्श ग्रामपंचायतचे ग्रा वि अधिकारी यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्रदान… ...

नयाकुंड आदर्श ग्रामपंचायतचे ग्रा वि अधिकारी यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्रदान… — ग्राम पंचायत अधिकारी प्रियंका रोशन बोरकर आदर्श ग्रामसेवक पुरस्कारने सन्मानित…

   कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

पारशिवनी :- पंचायत समिती, पारशिवनी अंतर्गत नयांकुड ग्राम पंचायतच्या ग्राम विकास अधिकारी प्रियंका रोशन बोरकर यांना आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

        जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, राज्याचे नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल, विभागीय सहआयुक्त कमलकिशोर फुटाणे विस्तार अधिकारी वाघ यांच्या हस्ते पाटील यांना प्रदान करण्यात आला.

            ग्रा. पं. नयाकुंड ग्राम विकास अधिकारी प्रियंका रोशन बोरकर यांच्या कार्यकाळात नयाकुंड या ग्राम पंचायतींना प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना, स्वछ गाव स्पर्धा, नरेगा योजनेतून तालुक्यात सर्वात कामे, गाव डिजिटलायझेशन, स्वच्छता अभियान, कर संकलन, गाव सुशोभिकरण, यात यश मिळविले आहे.

        यातूनच त्यांना जिल्हास्तरावर आदर्श ग्राम पंचायत अधिकारी म्हणून गौरविण्यात आले. या पुरस्कारचे नयाकुंडच्या सरपंच सुधिर अवस्थी, उपसरपंच अल्केश वाघाडे , ग्राम पंचायत सदस्य यासह विविध विभाग कर्मचारी, गावकऱ्यांनी कौतुक केले.