Home शैक्षणिक विदर्भात पहिल्यांदाच शब्दावली आयोगाचा 2 दिवसीय राष्ट्रीय सांगोष्टी कार्यक्रम साईबाबा आर्टस् अँड...

विदर्भात पहिल्यांदाच शब्दावली आयोगाचा 2 दिवसीय राष्ट्रीय सांगोष्टी कार्यक्रम साईबाबा आर्टस् अँड सायन्स कॉलेज पारशिवनी येथे संपन्न!..

   कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

पारशिवनी :-“भारत सरकार तर्फे वैज्ञानिक तथा तकनिकी शब्दावली आयोग शिक्षा मंत्रालय दिल्ली”च्या सहयोगाने पारशिवनी तालुक्यातील साईबाबा कला आणि विज्ञान महाविद्यालयात आयोजित राष्ट्रीय शब्दावली संगोष्ठी कार्यक्रम/मराठी भाषा दिनांक 10 व 11 सप्टेंबर 2025 दोन दिवसीयराष्ट्रीय शब्दावली संगोष्ठी कार्यक्रम/मराठी भाषा संपन्न झाली.

        “वैज्ञानिक शब्दावलीचे महत्त्व, शिक्षणात प्रादेशिक भाषा आणि देशाचा शाश्वत विकास”राष्ट्रीय शब्दावली संगोष्ठी कार्यक्रम/मराठी भाषा विदर्भातील 105 प्राध्यापाकांची निवड अगदी निशुल्क करण्यात आलेली होती.

               2 दिवसाच्या या सांगोष्टीत 9 तज्ज्ञांनी प्रादेशिक भाषेतून म्हणजेच विदर्भातील मराठी भाषेतून विज्ञानातील विषय मराठीतील शब्दातून कस काय विद्यार्थ्यां साठी फायदेशीर व उत्तम दर्जाचे शिक्षण देऊन भारताचा शाश्वत विकासाचे व राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 चे उददीष्ट कस साध्य करता येईल अश्या विविध विषयावर मार्गदर्शन केले.

         राष्ट्रीय शब्दावली संगोष्ठी कार्यक्रम/मराठी भाषाच्या कार्यक्रम प्रभारी डॉ.अशोक सेलवटकर सहायक निर्देशक शब्दावली आयोग भारत सरकार नवी दिल्ली हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर नागपूर विद्यापीठातील व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ.समयजी बनसोड सर यांनी उद्घाटक म्हणून संबोधन करतांना भारताला प्रादेशिक भाषेत काय महत्व येणार आहे. तसेच प्राध्यापकांची भूमिकाच भारताच्या शाश्वत विकासाचे ध्येय गाठण्यात मुख्य भूमिका बजावनार आहे या बद्दल प्रकाश टाकला.

              याच कार्यक्रमात नागपूर विद्यापीठातील व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. समयजी बनसोड यांनी नागपूर पुस्तक महोत्सवाचे विमोचन सुद्धा केले.

          त्या नंतर दुसऱ्यादिवशी ११ सेप्टेंबर ला समारोपीय समारंभात डॉ.वर्षा धुर्वे विभाग प्रमुख प्राणिशाश्त्र नागपूर विद्यापीठ यांनी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थिती दर्शवून मार्गदर्शन केले.

         कार्यक्रमाच्या समारोपाला साईबाबा आर्टस् अँड सायंन्सचे सचिव श्री प्रकाशजी डोमकी यांनी आपल्या महाविद्यालयात संपूर्ण व्यवस्थापन करून विदर्भातून आलेल्या सर्व प्राध्यापकांना या कार्क्रमातून एक संदेश दिला सर्वानी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या महाविद्यालयातुन मराठी भाषेचा उपयोग करून उत्कृष्ठ विद्यार्थी घडवा हे आव्हाहन केले.

               तर कार्यकारी प्राचार्य डॉ. योगेंद्र नागराळे यांनी सर्वांचे आभार मानले.

       कार्यक्रमाला 98 प्राध्यापक बरेच प्राचार्य, दोन दिवस मुक्कामी पारशिवनी येथे आलेत.

          मुळता शब्दावली आयोग भारत सरकार कडे 2 दिवसीय राष्ट्रीय सांगोष्टी विदर्भात व आपल्याच महाविद्यालयात आयोजित करा हा प्रस्थाव या कार्यक्रमाचे खरे शिल्पकार प्राणिशाश्त्र विभाग प्रमुख व कार्यक्रम समन्वयक डॉ. प्रशांत प्रभाकर इंगळे यांच्या अथांग मेहनती मुळे हे सर्व घडून आले.

        यात त्यांचे सहकार्य प्रा.अनिल बोन्द्रे, डॉ.विनोद पुरकाम सागर बावने, पवन भेलावे, रोशन आमले, मस्के सर, सौरभ सावजी तसेच इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले.