शेखर ईसापूरे
उपसंपादक
जिल्ह्याचे स्थळ असलेल्या भंडारा येथे आज पहाटे पासून मुसळधार पावसाने हजेरी लावली होती.दोन तास झालेल्या मुसळधार पावसामुळे भंडारा येथील काही भाग जलमय झाला आहे.
तर अनेक नागरिकांच्या घरी पाणी शिरले आहे.याचबरोबर काही शाळेचे आवार तलामय झाले असल्याचे दृश्य बघायला मिळाले आहे.
नाल्यांची योग्य प्रकारे सफाई केली जात नसल्याने नागरिकांच्या घरात पाणी शिरले असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
विजांच्या कडकडाटासह सुमारे दोन तास भंडारा येथे झालेला पाऊस अनेकांच्या मनात अक्षरशः धास्ती भरवणारा ठरला.
भंडारा शहरातील शास्त्री चौक परिसरात सर्वत्र जलमयस्थिती दिसली.याचबरोबर भंडारा शहरातील नूतन विद्यालय परिसरात पावसाचे पाणी शिरलं आहे.यामुळे शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना अळचणीचे ठरणार आहे.



