शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी…
चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा माजी विरोधी पक्षनेते,राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्य जनरल सेक्रेटरी डॉ.सतीष मनोहरराव वारजूकर यांच्या वाढदिवसानिमित्त १६ सप्टेंबरला चिमूर येथे,”भव्य रक्तदान शिबिराचे,आयोजन करण्यात आले आहे.
“करुया रक्तदान देऊया जिवदान,या संकल्पनेला अनुसरून डॉ.सतीष वारजुकर यांच्या वाढदिवसानिमित्त १६ सप्तेंबर रोज मंगळवारला भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
रक्तदान शिबिराचे स्थळ राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जेष्ठ कार्यकर्ता धनराजजी मालके यांचे कार्यालय असून,सदर कार्यालय जामा मस्जिद समोर मेन रोड चिमूर येथे आहे.
रक्तदान दात्यांनी १६ सप्तेंबरला होणाऱ्या रक्तदान शिबिरात सहभागी होऊन मोठ्या प्रमाणात रक्तदान करण्याचे आवाहन चिमूर तालुका काँग्रेस कमिटी पदाधिकाऱ्यांद्वारे,चिमूर शहर काँग्रेस कमिटी पदाधिकाऱ्यांद्वारे,महिला तालुका काँग्रेस कमिटी पदाधिकाऱ्यांद्वारे,चिमूर तालुका युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांद्वारे करण्यात आले आहे.



