ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्यूज भारत
खंडाळा :- पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी टिळक विद्यालय, खंडाळा येथील विद्यार्थ्यांनी एक अनोखा उपक्रम राबवला. सामाजिक वनीकरण, शिवणी बांध यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शाळेच्या सहकार्याने विद्यार्थ्यांनी तब्बल २,००० सिडबॉल्स (बीजगोळे) तयार केले.
या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यांनी माती, शेण यांचे मिश्रण करून विविध प्रकारच्या झाडांच्या बिया वापरून सीडबॉल्स बनवले. हे सीडबॉल्स डोंगरमाथ्यावर आणि रस्त्याच्या कडेला, जंगलातील मोकळ्या जागांवर फेकले जातील. पावसाळ्यात त्यांना पाणी मिळाल्यावर त्यातून रोपे तयार होतील.
यावेळी बोलताना मुख्याध्यापक ए.एन. निर्वाण सर यांनी सांगितले की, ‘पर्यावरणाचे रक्षण ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच पर्यावरणाची जाणीव व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला. सामाजिक वनीकरण विभागाचे मार्गदर्शन आम्हाला मिळाले, त्यामुळे हा उपक्रम यशस्वी झाला.’
या कार्यक्रमात सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी, विद्यालयातील शिक्षक पी एन कापगते, डी.डी. तुमसरे, आर.जे. करंजेकर, ए.आर. कुंभरे, एम.यु. मेश्राम मॅडम, एम.डी. मेश्राम मॅडम आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे परिसरात हिरवळ वाढण्यास मदत होईल.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता विद्यालयातील पी.एस. मुंगुलमारे, एन.डी. टेंभुर्णे, एस.एम. मेंढे विद्यालयीन कर्मचारी वर्गाने अथक परिश्रम घेऊन सहकार्य केले.



