दहावी,बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.. — १००% गुण प्राप्त नऊ विद्यालयाच्या प्राचार्यांचे भव्य स्वागत.. — शिक्षण सभापती राजकुमार कुसुंबे व सभापती मंगला निबोने यांचा पुढाकर.. — दिव्यांग विद्यार्थी अर्थव भीमटे, क्षद्धा गजभिये यांचा विशेष गौरव..

 

     कमलसिंह यादव

तालुका प्रतिनिधी पारशिवनी

 

पारशिवनी :- आज गुरुवार दिंनाक १५/६/२०२३ ला दुपारी जिल्हा परिषद नागपूरचे शिक्षण व अर्थ समिती सभापती राजकुमार कुसुंबे यांचे पुढाकाराने आणि पंचायत समिती पारशिवनीच्या सभापती मंगला उमराव निंबोने यांचे कल्पनेतून पारशिवनी तालुक्यातील तसेच तालुका गट शिक्षण अधिकारी सौ. वंदना हटवार यांचे सहकार्यने दहावी आणि बारावीतीतल गुणवंत विद्यार्थी आणि 100% विद्यार्थी उत्तीर्ण विद्यालयाचे एकुण नऊ प्राचार्य यांचा गुण गौरव करून सत्कार करण्यात आला. 

     तसेच दिव्यांग विदयार्थी विशेष गुणगौरव सोहळा पंचायत समिती सभागृह पारशिवनी येथे संपन्न झाला.

    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण व अर्थ समिती सभापती राजकुमार कुसुंबे तर प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती सभापती मंगला उमराव निंबोने , माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे जि.प. सदस्या अर्चना दिपक भोयर उपसभापती करुणा भोवते, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती सुभाष तडस, पंचायत समिती उपसभापती करुणा भोवते, पंचायत समिती सदस्य मीना कावळे, निकिता भारद्वाज, संदीप भलावी, नगरसेवक विजय भुते, सामाजिक कार्यकर्ते श्रीधर झाडे, तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष प्रदीप दियेवार, ज्येष्ठ पत्रकार गोपाल कडू, सीताराम भारद्वाज . बिडीओ सुभाष जाधव, तालुका गट शिक्षण अधिकारी सौ वंदना हटवार प्रामुख्याने उपस्थित होते. 

       पारशिवनी तालुक्यातील दहावीच्या परीक्षेत १६३० विद्यार्थ्यांपैकी १५०१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी ९२.०८ आहे. दहावीच्या परीक्षेत तालुक्यातून प्रथम -वैष्णवी संतोष सिंग (बी.के.सी.पी.हायस्कूल कन्हान), द्वितीय -श्वेता राकेश कैथवार (विद्या मंदिर हायस्कूल टेकाडी), तृतीय – अमिषा कैलास राऊत (श्री. नारायणा हायस्कूल कन्हान) यांनी तर दिव्यांग गटातून प्रथम – अथर्व श्याम भिमटे ( केसरीमल पालीवाल विद्यालय पारशिवनी), द्वितीय – क्षितिजा अनमोल भोयर ( बळीराम दखने विद्यालय कन्हान), तर तृतीय स्थान किस्मत दिलीप बडवाइक ( हरीहर विद्यालय पारशिवनी) या विद्यार्थ्यांचे विशेष सत्कार केले.

       बारावीच्या परीक्षेत १२७८ विद्यार्थ्यांपैकी ११५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी ८९.९८ टक्के आहे. कला शाखेत सानिया नवाज पठाण (केसरीमल पालीवाल कनिष्ठ महाविद्यालय पारशिवनी), विज्ञान शाखेत तनिशा सतीश राऊत (धर्मराज कनिष्ठ महाविद्यालय कन्हान), वाणिज्य शाखेत वेदिना लक्ष्मीनारायण महल्ले (नारायणा कनिष्ठ महाविद्यालय कन्हान), एम, सी. व्ही.सी.शाखेतून भूपेंद्र मनोज भांडवलकर ( हरीहर कनिष्ठ महाविद्यालय पारशिवनी) यांनी तालुक्यातून प्रथम क्रमांक प्राप्त केला.

      तर बारावीतील दिव्यांग गटातून श्रद्धा दुर्वास गजभिये (हरीहर कनिष्ठ महाविद्यालय पारशिवनी ) आणि सुनील भगवंत निषाद (नारायणा कनिष्ठ महाविद्यालय कन्हान) यांनी विज्ञान शाखेतून अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त केला. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि श्री खुशाल कापसे सर को लिखित वेधोत्सव स्वातंत्र्याचा हे पुस्तक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. 

     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. खुशाल कापसे सर यांनी तर प्रास्ताविक पंचायत समितीच्या उपसभापती करुणा भोवते यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गटशिक्षण अधिकारी सौ वंदना हटवार , शिक्षण विस्तार अधिकारी कैलास लोखंडे, साधन व्यक्ती अशांत खांडेकर, विनोद घारड, नितीन निनावे, सारिका जाधव, सुरेखा जुमडे, मंजुषा घोडे, सेवकराम ठाकूर, यशवंत मेश्राम, गजेश मेश्राम मुनेश दुपारे यांनी सहकार्य केले.