शिवसेना ( ठाकरे) गटाचा भद्रावती मच्छिंद्र मच्छुवा सहकारी संस्था वर सत्ता स्थापन…. — श्री.वाल्मिकी मत्स्य विकास सहकार पॅनलचे ११ पैकी ९ उमेदवार विजय…

उमेश कांबळे ता प्र भद्रावती

        भद्रावती मच्छिंद्र मच्छुवा सहकारी संस्था मर्यादित भद्रावती र.नं. ७८४ संस्थे वर वरोरा -भद्रावती विधानसभा प्रमुख तथा सामाजिक कार्यकर्ते रवींद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनात तसेच भद्रावती तालुका प्रमुख नरेन्द्र पढाल यांच्या नेतृत्वात पंचवार्षिक निवडणूक पार पडली. 

           दिनांक १४ मे ला पार पडलेल्या निवडणुकीत श्री वाल्मिकी मत्स्य विकास सहकार पॅनलचे ११ पैकी ९ उमेदवार  निवडून आलेत. त्यामुळे बहुमतात असलेल्या रवींद्र शिंदे यांच्या गटाचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला. त्यात शंकर बंडुजी कामतवार, श्रीराम बुधाजी नागपुरे, मधुकर गंगाराम पचारे सुधाकर पैकू मांढरे, सुरेश माधव मांढरे, संगीता अजय नागपुरे, मंदा प्रकाश मांढरे, दिलीप किसन मांढरे, राजेंद्र नामदेव बगडे असे संचालक मंडळातील संचालक विजयी झाले त्या सर्वाचे अभिनंदन करण्यात आले.