माता भीमा आई रामजी आंबेडकर यांच्या जयंती निमित्त.. — जन्म १४ फेब्रुवारी १८५४ मु.आंबेटेंबे,ता.मुरमाड ..

 

       माता भीमा आई रामजी सपकाळ यांचे जीवन कार्य प्रेरणादायी व दिशादर्शक आहे.कुटुंबियासह समाजातील नागरिकांना उत्तम साथ देण्याचे कार्य भीमाबाई यांनी केले.

       त्यांचे वडील धर्माजी पंडित ठाणे जिल्हातंर्गत मुरबाड तालुक्यातील मौजा आंबेटेंबे गावचे.भिमा आईचे वडील धनाड्य श्रीमंत महार जातीतील वजनदार सदगृहस्थ होते.भिमाबाईचे वडील सैन्यामधे स्वकर्तृत्वाने व बहादुरीने सुभेदार हे पद त्यांनी मिळविले होते.त्यांना भीमाबाई,बायनाबाई व गणपत अशी तीन आपत्ये होती.

         भीमाबाई ह्या त्यांच्या ज्येष्ठ कन्या.त्या दिसायला सुंदर,उंच व भारदस्त होत्या.त्या बालपणापासून प्रखर स्वाभिमानी व हट्टी स्वभावाच्या होत्या.त्यांचे वडील सुभेदार असल्यामुळे कुटुंबामध्ये शिस्त व नीटनेकेपणा होता व महार जातीतील सुसंस्कृत व प्रतिस्टीत घराणे म्हणून त्यांच्या परिवाराकडे बघितले जायचे.

         त्यांनी आपले पंडित आडनाव त्यांच्या तालुक्याचे नाव मुरबाड यावरून बदलून मुरबाडकर असे नाव धारण केले.सुभेदार मुरबाडकर म्हणून ते त्यांच्या पंचेक्रोशित सुपरिचित होते.आपल्या ज्येष्ठ कन्या भीमाबाई यांच्यासाठी अनुरूप स्थळ शोधण्याचे काम मुरबाडकर करू लागले.त्या काळी बाल विवाहाची प्रथा होती.सैनिक असलेले रामजी मालोजी सपकाळ हे योग्य वर भीमाबाई साठी ठरू शकतात.याची खात्री पटली त्यांचे वडील यांना झाली.

         डिसेंबर 1967 ला त्यांचा विवाह अतिशय मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.लग्नाच्या वेळी भीमाबाईचे वय 13 वर्षाचे होते व रामजीचे वय 19 वर्षाचे होते.

        भीमाबाईचे सासर घर अतिशय गरिबीचे होते.त्यांना मनासारखे दागदागिने व कपडे घेता येणार नाही.माहेरमध्ये वैभवात आणि सुखसुविधात राहिलेली भीमाबाई सासरी हे वैभव उपभोगू शकणार नाही.भीमाबाई प्रखर स्वभावाच्या होत्या.त्या खोचक प्रश्न विचारणाऱ्या स्त्रीचा समाचार घेत. 

         त्या एका प्रसंगात म्हणाल्या होत्या अंगावर दागदागिने घाळून मला आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन करणे मुळीच आवडत नाही.त्या नंतर भीमाबाई त्यांच्या माहेरी खुप दिवस गेल्याच नाही.मी माझ्या पतीच्या संसारा मध्ये काबाड कष्ट करून सुख समृध्दी मिळविण आणि पुढील आवुष्यामध्ये भीमाबाई खुप कष्ट करू लागल्या.

        माहेरच्या श्रीमंतीचा मोठेपणा त्यांनी कधीही कुणाला सांगत बसल्या नाही.कितीही बिकट परिस्थितीचे दिवस आले तरी पण त्यांनी कधी हार मानली नाही.आपले पती कामा निमित्त पुण्याला गेले असताना त्यांनी सांताक्रुझ या ठिकाणी सार्थपणे कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असत.

        रामजी बाबा पुण्यावरून पैशे पाठवत असत.त्या तुटपुंज्या रकमेवर घर चालवणे जिकिरीचे होते.तेव्हा भीमाबाई डोक्यावर टोपली घेवून खडी टाकण्याचे काम करीत असे.आपण करीत असलेल्या कष्टाची जाणीव आपल्या पित्याला होऊ दिली नाही. रामजी बाबा नोकरी करीत असताना त्यांना पुढचे शिक्षण घेण्याची त्यांना ओढ होती.नोकरी करून त्यांनी शिक्षण पूर्ण केले.शिक्षेकी पदाची त्यांनी परीक्षा दिली,त्या परिक्षा मध्ये ते पास झाले.नंतर मध्येप्रदेश मध्ये महू या गावी लष्कराच्या शाळेत शिक्षक या पदावर विराजमान झाले.

        मुख्याध्यापक म्हणून कामावर रुजू झाले.त्या नंतर त्यांना मानसन्मान मिळू लागला. हळू हळू त्यांच्या परिस्थितीमध्ये मोठा सुधार होऊ लागला.त्या नंतर भीमाबाईला रामजी आंबेडकर यांनी चांगले कापड व दागदागिने करून दिले.त्यांना आपल्या माहेरची आठवण झाली.त्या रामजी आंबेडकर यांना म्हणाल्या आपण माझ्या माहेरी जायला पाहिजे.खुप दिवस झाले मी आपल्या कुटुंबासह जावं म्हणते.तुम्ही आले तर माझ्या माहेरच्या सर्वाँना आनंदच होईल.रामजी बाबा तयार झाले.सर्वजण मिळून भीमाबाई त्यांच्या माहेरी जावून आले.भीमाबाईच्या हट्टी स्वभाचे सर्वाँना नवल वाटले.

        ज्या बाईंनी भिमाईला खोचट शब्दात बोलले होते त्या बाई समोर जावून म्हणाल्या बघ आता माझे दागिणे.माणसानं अस कुणी कुणाला बोलू नव्हे,सर्व दिवस सारखेच नसतात.भिमाईच्या माहेरी त्यांचे खुप कौतुक केले.

        नंतर त्यांना मानसन्मान मिळू लागला.त्यांना तेरा आपत्ये झाली.त्यातील मंजुळा,गंगा,रमा,तुळासा,अशा चार मुली जिवंत राहिल्या व दोन मुले जिवंत राहिली.बाळाराम, आनंदराव याचं बालपण जिवन खुप आनंदी होत.काही दिवसांनी रामजी आंबेडकर यांना भीमाबाईचे पोटी 14 व रत्न जन्माला आले.14/4/1891साल आनंदाने वारे वाहू लागले.महू या गावी जिकडे तिकडे साखर पान वाटू लागले.

        भीमाबाई व सुभेदार रामजी आंबेडकर यांना राज बिंडा अस बाळ जन्माला आले.बाळाची हुशारी चतुराई त्याच्यात दिसून येत होती. म्हणतात ना बाळाचे पाय पाळण्यात दिसतात.बाळाचे नाव ठेवण्यात आले भीम.भिवा बाळ जन्माला आले आनंदाला उधाण आले.

         आपल्या बाळाला वाढवणे व घडवणे त्याच्या भविष्याची तरतूद करणे,भविष्याच्या दृष्टीने आपल्या बाळाला लहानपणापासून धडे देणे व त्याची वाढ होत असतांनाही त्याच्यामध्ये त्याच्या गुणाची पेरणी करणे.त्यास आयूष्याच ध्येय ठरवून देणे.ज्या क्षेत्रामध्ये तो पारंगत होत असेल त्या क्षेत्रात त्याने आधिक पुढे जावे यासाठी आई-वडील धडपडत असत.

        स्वप्ने पूर्ण करण्यासाठी स्वताला विसरून झिजत असतात.भिवा हळू हळू मोठा होवू लागला.एक दिवस बाहेर खेळायला गेला असता वस्तीतल्या चाळीत राहणाऱ्या मुलांनी त्याला खेळू दिले नाही.तू अस्पृश्य जातीचा मुलगा आहेस,तू आमच्या बरोबर खेळू नकोस.त्यानंतर धावत घरी आला व आईला म्हणाला का ती मुले खेळू देत नाही मला.मला खेळायचे आहे.भिवा खुप हट्टी होता.भीमाबाई ने त्याला समज दिली.ते उच्च वर्णीय लोक आहेत.आपण अस्पृश्य आहोत. काही दिवसांनी भीमाबाईने भिवाला शाळेत दाखल करण्याचां आग्रह धरला. 

       रामजी आंबेडकर भिवाला घेवून शाळेत नाव दाखल करण्यासाठी गेले त्या मास्तरांनी एक अट ठेवली.तो शाळेच्या बाहेर बसून शिकत असेल तर त्याचे नाव घेण्यात येईल.रामजी बाबानी होकार कळवला.लाडका भिवा रोज शाळेत जावू लागला.जिथे लोक चपला,बूट काढून ठेवतात 

तिथे भिवा एक गोणपाटचा तुकडा घेवून शाळेत जात होता आणि त्याच्या रोजच्या जागेवर 

बसत होता.मास्तरांनी शिकविलेलं ध्यान लावून ऐकत होता.काही थोड दूर बसल्यामुळे समजणं कठीण जात होत.भिवा आईला सागंत होता.भीमाबाईना भिवाची चिंता वाटत होती.त्यातच भीमाबाईला मस्तक सुळ म्हणजे डोक्याचा आजार जडला होता.सुभेदार रामजी आंबेडकर यांनी आपल्या पत्नीच्या आजाराचा खुप इलाज केला.परंतु त्यांचा आजार जास्तच झाला होता.

         त्यामुळे भीमाबाई 20/12/1896 ला निधन झाले.भीमाचे आईचे छत्र हरपले. आईच्या लाडका भिवा आईच्या प्रेमाला पोरका झाला.भिवाला खुप दुःख झाल.आई म्हणजे आई असते.आईच्या प्रेमाची जागा दुसऱ्या कोणालाच भरून काढता येत नाही.भिवा आईविना वाढू लागला.रामजी आंबेडकर यांना खुप कठीण झाले होते.भीमाबाईच्या  

 जाण्याने हमसून हमसून भिवाला जवळ घेवुन रामजी आंबेडकर बाबांना रडत होते.चिमुकला भिवा जेमतेम पाच ते सहा वर्षे वय असेल. आईविना पोरका झालेला भिवा 

पुढे जाऊन ज्ञानाचा सागर झाला.हे सर्व ज्ञान त्यांना त्यांच्या आईकडून मिळाले होते.

        अशा महमातेला त्यांच्या 167 व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..

                  शब्दांकन

                अशोक तपासे

                  औरंगाबाद