Home Social संत जगनाडे महाराज पुण्यतिथीनिमित्त शंकरपूर येथे भव्य दोन दिवसीय गुणगौरव व समाज...

संत जगनाडे महाराज पुण्यतिथीनिमित्त शंकरपूर येथे भव्य दोन दिवसीय गुणगौरव व समाज प्रबोधन महोत्सव उत्साहात संपन्न…

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी…

       चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यातील मौजा शंकरपूर येथे श्री.संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त दिनांक १३ व १४ जानेवारी २०२६ रोजी भव्य दोन दिवसीय गुणगौरव सोहळा व समाज प्रबोधन महोत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला. 

       या महोत्सवाचे आयोजन श्री.संताजी जगनाडे महाराज देवस्थान,शंकरपूर व श्री.संताजी तेली समाज मंडळ,शंकरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.

           संत जगनाडे महाराजांनी आपल्या आयुष्यभर विषमतावाद,अंधश्रद्धा व अन्यायाविरुद्ध लढा देत समाजात समता,बंधुता व मानवता या मूल्यांचा प्रसार केला.

              त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठीच या महोत्सवात सामाजिक,धार्मिक व प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

    पहिल्या दिवसाचे कार्यक्रम….

      महोत्सवाच्या पहिल्या दिवशी,मंगळवार दिनांक १३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ग्रामसफाई व वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आला.

        सायंकाळी घटस्थापना करून गावातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली.रात्री संताजी भजन मंडळ,शंकरपूर तसेच परिसरातील इतर भजन मंडळांचे भक्तिमय भजन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले.

दुसऱ्या दिवसाचे कार्यक्रम…

          बुधवार,दिनांक १४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ग्रामसफाई,रांगोळी सजावट व ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला.

         ध्वजारोहण श्री.शरद निकुरे व श्री.रविंद्र राखडे यांच्या हस्ते करण्यात आले.त्यानंतर भजन कार्यक्रम झाले.

         सकाळी ११ ते २ या वेळेत सप्तखंजेरी वादक,सत्यपाल महाराजांचे शिष्य ह.भ.प. प्रदिपपाल चौधरी महाराज यांचे जाहीर कीर्तन व समाज प्रबोधन कार्यक्रम संपन्न झाले.त्यांच्या कीर्तनातून सामाजिक समता,व्यसनमुक्ती,स्त्री-सन्मान व युवकांनी सामाजिक बांधिलकी जपावी,असा प्रभावी संदेश देण्यात आला.

        मान्यवरांचे मार्गदर्शन…

            दुपारच्या सत्रात मान्यवरांचे मार्गदर्शन झाले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष – प्राचार्य विठ्ठलराव निखुले,उद्घाटक – श्री. डी.के. निकुरे,नायब तहसीलदार,चिमूर हे होते.

         कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.संताजी तेली समाज मंडळ, शंकरपूरचे अध्यक्ष श्री.अशोक ज्ञानेश्वर चौधरी यांनी केले.

            सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती श्री.साईशभाऊ वारजूकर (सरपंच, ग्रा.पं. शंकरपूर),श्री. धनराजभाऊ मुंगले (ओबीसी संघटक, महाराष्ट्र प्रदेश), श्री. योगेशभाऊ समरीत (संयोजक, महाराष्ट्र आरक्षण संघर्ष समिती, चंद्रपूर), सौ.भावनाताई बावनकर (माजी पं.स. सदस्या, चिमूर),श्री.घनश्यामजी डुकरे (जिल्हा उपाध्यक्ष, विदर्भ तेली समाज महासंघ),श्री.रामूजी सहारे (सचिव, ए.ते. समाज, भंडारा), सौ.सविताताई चौधरी (माजी सरपंच/सदस्या, शंकरपूर), डॉ.परसरामजी नागोसे (अध्यक्ष, ए.ते. समाज, चिमूर), डॉ.चेतन बेलखोडे,श्री. भाऊरावजी बावनकर,श्री.बाळूजी नागोसे, श्री.सतिश देव्हारे,श्री.ईश्वरभाऊ डुकरे,सौ.वंदनाताई सहारे,श्री. प्रेमनाथ ठाकरे,श्री.वसंताजी चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

   समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार याप्रसंगी करण्यात आला.

१) सुजल नारायण चौधरी – इयत्ता दहावी,२) प्रतीक गुरुदेव निकुरे – इयत्ता दहावी,३) रिता यशवंत भजभूजे – इयत्ता बारावी,४) समीक्षा अशोक भजनकर – इयत्ता बारावी…

नवजात कन्या गौरवाचा अभिनव उपक्रम…

      समाजात स्त्रीभ्रूणहत्या रोखणे,कन्येच्या जन्माचे स्वागत करणे व स्त्री-सन्मानाची भावना वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने श्री. संताजी तेली समाज मंडळ,शंकरपूरचे अध्यक्ष श्री.अशोक ज्ञानेश्वर चौधरी यांच्या संकल्पनेतून “नवजात कन्या गौरव उपक्रम” मागील वर्षापासून सुरू करण्यात आला आहे.

        या उपक्रमांतर्गत समाजातील नवजात मुली व त्यांच्या पालकांचा सार्वजनिक कार्यक्रमात गौरव करण्यात येतो.नवजात मुलीस ड्रेस,मातेस साडी व वडिलांना टॉवेल देऊन सन्मान केला जातो.हा उपक्रम समाजात सकारात्मक मानसिकता निर्माण करणारा व इतर सामाजिक संस्थांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

         यावर्षी यामिना पंकज चौधरी,तेजस्विनी आशिष ठाकरे,रजनी रामदास शेंडे,निकिता अविनाश सहारे व कविता संदीप राखडे या नवजात कन्यांचा त्यांच्या पालकांसह गौरव करण्यात आला.

समारोप….

      सायंकाळी हळदीकुंकू,तिळगुळ,गोपालकाला व त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

       कार्यक्रमाचे संचालन प्रमोद समर्थ व जयेश चौधरी यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री.संताजी तेली समाज मंडळ,शंकरपूरचे अध्यक्ष श्री.अशोक ज्ञानेश्वर चौधरी यांच्या नेतृत्वाखाली मंडळाच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.

पदाधिकारी…

          अध्यक्ष – श्री.अशोक ज्ञानेश्वर चौधरी,उपाध्यक्ष – श्री.दिनेश तु.शेंडे,सचिव – श्री. बंडू सो. भजभूजे,श्री.प्रमोद बा.सहारे,कोषाध्यक्ष – श्री.नरेंद्र जा.आदमने,सहसचिव – श्री. रविंद्र म.राखडे,मार्गदर्शक – श्री. मधुकर द.राखडे..

सदस्य…

        श्री.भारत शा.चौधरी,श्री.रामकृष्ण ह. समर्थ,श्री.वामन ग.चौधरी,श्री.प्रमोद मु.निकुरे,श्री. अंकुश मा.करकाडे,श्री.रविंद्र ई. कोलते,सौ.वंदना बा. सहारे,सौ. निता स. तरारे, सौ.रंजना मा. दुरबुडे,सौ.पुष्पा कि.राखडे,श्री.रविंद्र ग. भजनकर,श्री.अविनाश बा. सहारे,श्री.गुरुदास शा. भजनकर,श्री.सचिन सो.निकुरे,श्री.शरद झि.निकुरे,श्री.कैलास पां. सहारे,श्री.दिनेश चं.दुरबुडे,श्री.अरविंद आ. राखडे,श्री.संदिप मु. ठाकरे,श्री.आशिष वि. नागोसे.

          या पावन प्रसंगी समाजबांधव,माता-भगिनी, युवक-युवती व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.