सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी जनतेच्या प्रलंबित समस्या तात्काळ निकाली काढावे… — आमदार कृष्णा गजबे यांचे निर्देश… — कोरची पंचायत समितीची वार्षिक आमसभा विविध विषयांवर गाजली…

ऋषी सहारे

संपादक

       ‌कोरची -तालुक्यातील सर्व विभागाकडे असलेल्या योजनांचा लाभ जास्तीत जास्त लाभार्थ्यांना मिळावा यासाठी सर्वच विभागांनी प्रयत्नशील राहून, आमसभेत जनतेतून आलेले सर्व प्रश्न समस्या यांची दखल संबंधित अधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेऊन जनतेच्या समस्या तात्काळ निकाली काढाव्यात, असे निर्देश आमदार कृष्णा गजबे यांनी दिले. कोरची पंचायत समितीची सन२०२२-२३ या वर्षाची वार्षिक आमसभा कोरची येथील पंचायत प्रशासकीय भवनसभागृहात घेण्यात आली यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

 ‌‌‌‌‌ ‌‌कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून गट विकास अधिकारी राजेश‌‌ फाये,माजी आमदार आनंद गेडाम, कोरची तहसीलदार‌ तथा प्रभारी तहसिलदार गणेश सोनवानी ,पोलीस.स्टेश.उपनिरिक्षक गणेश फुलकवर,

, विस्तार अधिकारी कृषी फुलझेले कोरची , कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुरेश काटेंगे कोरचीचे माजी सभापती ‌श्रावन‌‌ मातलाम,,पंचायत समिती सदस्य सदाराम नुरूटी, चांगदेव फाये, विलास घावडे, आंनद चौबे,देवराव गजभिये,गोंविद दरवडे, आदि उपस्थिति होते.

      सार्वजनिक बांधकाम विभागाचे अंतर्गत नाडेकल येथील पहिल्याच पाण्यात‌ पुल खंबे वाहून गेले,तसेच बोरी ते कोटगुल रस्त्यावर खंडे पडले आहे यांची चौकशी करा अशी मागणी नखाते यांनी आमदार कृष्णाभाऊ गजबे यांच्या जवळ प्रश्न उपस्थित केला.त्या चौकशी करून दोषीवर कार्यवाही करा अशी मागणी केला.तसेच लक्ष्मीपुर गावाला जाण्यासाठी रस्ता नाही .त्या तात्काळ मंजुर करा अशी मागणी गावकरी लोकांनी केली आहे. 

  ‌‌‌‌ या कार्यक्रमाची प्रास्ताविक पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेश फाये यांनी केले तर अहवालवाचन सांख्यिकी विस्तार अधिकारी राहुल कोपुल्लवार व आभार विस्तार अधिकारी कृषी फुलझले यांनी मानले. तसेच संचालन जितेंद्र साहाळा.यांनी केले.वार्षिक आमसभेला सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी,पत्रकार, सरपंच, उपसरपंच, सदस्य,शेतकरी, नागरिक, तसेच विविध पक्षाचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते. सदर सभेमध्ये प्रत्येक विभागाच्या कर्मचाऱ्याला आमदार यांनी त्यांच्या मार्फत येणारे सर्व कामे व्यवस्थित रित्या पार पाडून कोणताही लाभार्थी लाभापासून वंचित राहू नये याची दक्षता घ्यावी अशा प्रकारे निर्देश दिले.‌ प्रत्येक विभागाच्या आढावा घेत असताना आमदारांनी त्यांच्या नियोजनाबद्दल सुद्धा विचारपूस केली तसेच पंचायत समिती कोरची ला जिल्ह्यातून कर वसुली ला दुसरा क्रमांक प्राप्त झाल्यामुळे त्यांना हार्दिक अभिनंदन केले तसेच वेगवेगळ्या विभागामार्फत जसे की कृषी विभागामार्फत काही शेतकऱ्यांना बियाणे देऊन त्यांच्या आमदारांचे हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला तसेच घरकुल लाभार्थ्यांची सुद्धा ज्यांनी बांधकाम केले असे लाभार्थ्यांना चालू व श्रीफळ देऊन त्यांच्याही सत्कार करण्यात आला तसेच स्वच्छ भारत मिशन अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या सरपंच उपसरपंच सचिव यांचा सुद्धा शालू श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला व इतरही विभागाचे मार्फतीने जे उत्कृष्ट कामे झाली अशा लाभार्थ्यांना शालू स्लीपर देऊन आमदारांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.