प्रेमास नकार दिल्याने अल्पवयीन मुलीला पेट्रोल टाकुन मारण्याचा प्रयत्न..

 

उमेश कांबळे ता प्र भद्रावती

    प्रेमास नकार दिल्याने अल्पवयीन मुलीला पेट्रोल टाकुन मारण्याचा प्रयत्न दी १२ जुन ला सकाळच्या सुमारस् तालुक्यातील बेलगाव येथे झाला असल्याची घटना उघकीस आली असुन भद्रावती पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली आहे. 

     तालुक्यातील बेलगाव येथे घरा शेजारी राहणाऱ्या एकतर्फी प्रेम प्रकरणात् 14 वर्षिय मुलीला प्रेमास नकार दिल्याने तिच्या घरी जाऊन तिच्या अंगावर पेट्रोलची एक बाटल टाकुन मारण्याचा प्रयत्न केला आहे.

     सदर घटना घड़ताच मुलींच्या वडीलाने भद्रावती पोलिसात धाव घेतली,आरोपी सिद्धांत भेले रा. बेलगाव याला भद्रावती पोलिसांनी अटक केली असुन त्याला १५ जुन न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.सदर तपास भद्रावती पोलिस निरीक्षक बिपिन इंगळे करित आहे.