मोठ्या उत्साहात नागपूर येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी… — २० लाख बांधवांनी केले युगपुरुष डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन!

दिक्षा कऱ्हाडे/मध्यमा सवाई

              वृत्त संकलन

              नागपूर शहर म्हटले की,जगप्रसिद्ध इतिहासीक असे महानगर!या शहरात विश्वरत्न युगप्रवर्तक डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना विचारांनी मानणारा समाज हा १५ लाखांच्या घरात आहे.

        जगविख्यात प्रकांड पंडित डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा समाज/वर्ग नागपूर नगरात मोठ्या प्रमाणात असल्याने सहाजिकच आहे,या महानगरात संविधान निर्माता डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती विविध कार्यक्रमातंर्गत मोठ्या उत्साहात साजरी होणारच!.

            याच इतिहासीक शहरात १९५६ ला बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दिक्षा घेऊन व दिक्षा देऊन समाजमन परिवर्तन केले आणि जगप्रसिद्ध इतिहासीक धम्म क्रांती केली आणि विचार परिवर्तनाची दिशा सुनिच्छित केली.

         एका हाकने गोळा होणारा नागपूर महानगरीतील वैचारिक दृष्ट्या संवेदनक्षम व संवेदनशील असा प्रभावी बौद्ध समाज व इतर समाज विश्वभुषण डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना माझे म्हणतोय हेच आजच्या स्थितीत प्रचंड प्रमाणातंर्गत उत्तम विचारांची विश्व वैचारिक क्रांती होय..

         सर्वांचे उध्दारकर्ता असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची नागपूर शहरात मोठ्या प्रमाणात व मोठ्या उत्साहात पार पडत असलेली जयंती डोळ्यांची पारणे फिटवणारी होती व आहे.

           नागपूर महानगरातील अदभुत असा प्रचंड जनसमुदाय जेव्हा एकाच वेळी भारताचे निर्माते असलेल्या युगंधरास,”जयंती दिनानिमित्त, कोटी कोटी प्रणाम करतोय तेव्हा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या महान इतिहासिक कार्यातंर्गत मन ओलेचिंब होवून जातय.

            हजारो वर्षे गुलामगिरीत असलेल्या या देशातील ओबीसी,एससी,एसटी,व्हिजेंटी, अल्पसंख्याक,मागासवर्गीय आणि तमाम समाजाला व तमाम भारतीय स्त्रियांना कायद्यान्वये अधिकार हक्क बहाल करतोय आणि धार्मिक-मानसिक गुलामितून मुक्त करतो!..

         तेव्हा जगमान्य महान तत्वज्ञानी ठरलेल्या व असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या महाकार्याची, महान संघर्षाची यशोगाथा किती मोठ्या उंचिची आहे याचा थांगपत्ता लागत नाही…

      आजच्या स्थितीत उंच मानेने जगत असलेला भारत देशातील सर्व समाज डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या महा-कार्याला समजून घेतो आहे.आणि हेच वास्तव जगात वैचारिक क्रांती करणारी असेल…

           नागपूर महानगर म्हणजे देशातील व जगातील नागरिकांना योग्य दिशा देणारे वैचारिक केंद्र ठरतोय ते युगप्रवर्तक महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांमुळेच!