कौलगे येथे अखंड हरिनाम सप्ताह मध्येच रमजान रोजा (उपवास) सोडला.

दिनेश कुऱ्हाडे

  प्रतिनिधी

 कागल : कौलगे ता.कागल गावामध्ये गेले अनेक वर्ष हिंदू व मुसलमान दोन्ही समाजाची लोक खूप मित्रत्वाने व प्रेमाने राहत आहेत. दोघांच्यामध्ये कधीही वाद नाही. दोन्ही समाजाची लोक एकमेकांच्या मदतीसाठी खूपच अग्रभागी असतात.

कौलगे गावांमध्ये अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. याच दरम्यान रमजान ईद सारखा पवित्र सण सुरू आहे. या रमजान सणांमध्ये गावातील मुस्लिम लोक रमजान रोजा (उपवास) धरतात. आज सायंकाळी याच सर्व लोकांनी अंबिका देवालयाच्या समोर अखंड हरिनाम सप्ताह मध्ये येऊन तेथेच आपली पंगत बसून सर्व लोकासोबत फलाहार घेऊन आजचा रोजा सोडला. वर्तमान काळामध्ये रमजान व अखंड हरिनाम सप्ताह दोन्ही उत्सव एकत्र साजरा केला जातो. गावासहित परिसरातील गावांच्यासाठी खूप प्रेरणादायी व आदर्शवत गोष्ट आहे.अशा सकारात्मक कृतीने समाजामध्ये खूप योग्य संदेश जाईल. याप्रसंगी ह.भ.प.अमृतानंद महाराज यांच्यासह दोन्ही समाजातील प्रमुख लोक,वारकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.