Home Social लक्ष्मी नरसिंह मंदिरात मकर संक्रांत उत्साहात साजरी; हळदी-कुंकू कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद….

लक्ष्मी नरसिंह मंदिरात मकर संक्रांत उत्साहात साजरी; हळदी-कुंकू कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद….

 बाळासाहेब सुतार 

नीरा नरसिंहपूर प्रतिनिधी

        निरा नरसिंहपुर तालुका इंदापूर येथील लक्ष्मी नरसिंह मंदिरात मकर संक्रांती निमित्त पारंपरिक पद्धतीने हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. 

        यावेळी परिसरातील महिला भगिनींनी एकमेकींना हळदी-कुंकूचा मान देत सणाचा आनंद उत्साहात साजरा केला. महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

         लक्ष्मी नरसिंह देवस्थान हे पुराण काळातील प्रसिद्ध आसल्यामुळे या भागाचेही कुलदैवतही आहे. म्हणून मकर संक्राती नमित्त सालाबाद प्रमाणे इंदापूर, माळशिरस, माढा, या तीन तालुक्यातून लाखो महिला भगिनी मकर संक्रातीसाठी एकमेकींना हळदी कुंकाचा मान घेण्यासाठी येत असतात.

        ही कायमची परंपरा या ठिकाणी आजही आहे संक्रांतीचा सण सामाजिक ऐक्य, आणि नवचैतन्याचे प्रतीक मानला जातो. या निमित्ताने मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. महिलांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत तिळगुळ वाटप, शुभेच्छांची देवाण घेवाण केली. “तिळगुळ घ्या, गोड गोड बोला” या म्हणीप्रमाणे आपुलकी आणि स्नेह व्यक्त करण्यात आला. मेवा मिठाई व लहान मुलांच्या खेळण्याचे स्टॉल मोठ्या प्रमाणात आल्याने यात्रेचे स्वरूप निर्माण झालेले होते. यात्रेमध्ये खरेदी करण्यासाठी महिलांचा चांगलाच प्रतिसाद मिळालेला होता.

         नरसिंहपूर पोलीस स्टेशनचे एपीआय गजानन चेके साहेब व त्यांचे सर्व पोलीस पदाधिकारी यांनी मंदिर परिसरामध्ये चोक बंदोबस्त केलेला होता. तसेच नरसिंहपुरचे विद्यमान सरपंच नितीन सरवदे, उपसरपंच गुरुदत्त गोसावी, नरहरी काळे, आण्णासाहेब काळे, विलास ताटे, संतोष मोरे, श्रीकांत दंडवते, जगदीश सुतार, विठ्ठल देशमुख,अरुण क्षीरसागर, चंद्रकांत सरवदे, दशरथ राऊत,आनंद काकडे, विजय सरवदे, मगन क्षीरसागर, दत्तात्रय कोळी, गौरव दंडवते, कमलेश डींगरे, अभयकुमार वांगकर, प्रसाद दंडवते, नारायण दंडवते, अविनाश दंडवते, मुख्यविश्वस्त ज्ञानेश्वर अरगडे, देवस्थानचे सर्व विश्वस्त यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, समस्त ग्रामस्थ यांच्यावतीने आयोजन करण्यात आले.

         या निमित्त महिलांना एकत्र येण्यासाठी, परंपरा जपण्याची आणि सामाजिक नातेसंबंध दृढ करण्याची संधी मिळाल्याचे मत उपस्थित महिलांनी व्यक्त केले. 

         नरसिंहपुर ग्रामपंचायत व मंदिर समिती आणि स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

         या उपक्रमामुळे लक्ष्मी नरसिंह मंदिर परिसरात मकर संक्रांतीचा सण आनंद, भक्ती आणि एकोप्याच्या वातावरणात साजरा झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.