युवराज डोंगरे
उपसंपादक
खल्लार :- दर्यापूर शहरात अलीकडच्या काळात वाढत चाललेल्या अपघातांच्या घटनांचा गंभिर पध्दतीने विचार करून शहरातील जड वाहनांना सकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत शहरात प्रवेशबंदी करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे युवासेना जिल्हाप्रमुख अंकुश पाटील कावडकर यांनी केली आहे.
यासंदर्भात पोलिस निरीक्षक, पोलिस स्टेशन दर्यापूर यांना निवेदन सादर केले. शहरातील मुख्य रस्त्यांवरून धावणाऱ्या ट्रक, ट्रान्सपोर्ट आणि इतर भारी वाहनांमुळे शालेय विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख अंकुश पाटील कावडकर, शिवसेना जिल्हा समन्वयक प्रदीप वडतकर, शिवसेना विधानसभा संघटक बबनराव विल्हेकर, युवासेना तालुका प्रमुख सागर गिऱ्हे, युवासेना शहर प्रमुख रुपेश मोरे, शिवसेना उपशहर प्रमुख दिपक बगाडे, शिवसेना उपशहर प्रमुख सदाफ सुफी,उपसरपंच शरद आठवले, युवासेना उपतालुकाप्रमुख आशिष लायडे, युवासेना उपशहर प्रमुख शुभम विल्हेकर, युवासेना उपशहर प्रमुख राज गुजराती, निलेश ढाकरे, गिरीश रंगारी, कलीम कुरेशी यांसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहरातील वाहतूक पोलिस पथकाला योग्य उपाययोजना राबवून नागरिकांचे प्राण व सुरक्षितता जपण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.



