Home सांस्कृतिक धार्मिक व अन्नदान क्षेत्रामध्ये सतत 25 वर्ष गिरवी गावचा सिंहाचा वाटा असतो...

धार्मिक व अन्नदान क्षेत्रामध्ये सतत 25 वर्ष गिरवी गावचा सिंहाचा वाटा असतो :- श्री गुरु बापूसाहेब देहुकर महाराज… — श्री गुरु बापूसाहेब देहुकर महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता झाली…

 बाळासाहेब सुतार

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी

गिरवी तालुका इंदापूर येथे अखंड हरिनाम सप्ताहाचा भव्य समारोप श्री गुरु बापूसाहेब देहुकर महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, रवीवार दिनांक. ७/१२/२०२५ ते शनिवार दिनांक. १३/१२/२०२५ या आठवडाभर चाललेल्या उत्सवाला भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

          विविध धार्मिक कार्यक्रम, भजन,भारुड, प्रवचन पालखीची ग्राम प्रदक्षिणा उपक्रमांनी गिरवी गाव भक्तीत रंगुन गेले. समारोपाच्या दिवशी आयोजित काल्याच्या कीर्तनावेळी सभा मडम परिसर भाविक भक्तांच्या गर्दीने फुलून गेला. श्री गुरु बापूसाहेब देहुकर महाराजांनी भगवान श्रीकृष्ण आणि मारुतीच्या चरित्रातील प्रेरणादायी प्रसंगांचे सुंदर वर्णन करताना भक्तांना अध्यात्म, नैतिकता आणि सदाचरणाचा संदेश दिला. त्यांच्या गोड आवाजात कीर्तनामुळे उपस्थित भाविकांनी आनंद घेतला.

        सतत गेली 25 वर्ष चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजक गिरवी समस्त ग्रामस्थ, ह भ प अंकुश रणखांबे महाराज, आजी-माजी सरपंच, उपसरपंच, साखर कारखाना संचालक, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, समस्त ग्रामस्थ गिरवी, सहित सर्व भाविक भक्तांच्या वतीने नियोजन करण्यात आले.

       शेवटी काल्याच्या कीर्तनानंतर पुरण पोळीच्या महाप्रसादाचे आयोजक समस्त ग्रामस्थ गिरवी यांच्या वतीने करण्यात आले.चार हजाराहून अधिक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. आयोजक मंडळाकडून संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार मानण्यात आले.   

        अखंड हरिनाम सप्ताहातील सर्व कार्यक्रम भक्तिमय आणि अनुशासित पद्धतीने पार पाडल्याने भाविकांत समाधान व्यक्त होत आहे.आठ दिवस संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हभप अंकुश रणखांबे महाराज यांनी केले. तर शेवटी काल्याचा महाप्रसाद घेऊन सप्ताहाची सांगता झाली.