सावलीच्या आठवडी बाजाराला शिस्त लावणार कोण?  — रस्त्यावर दुकानांची गर्दी… — पोलीस व नगरपंचायत चे नियोजन कोलमडले..

     सुधाकर दुधे  

सावली तालुका प्रतिनिधी 

           सावलीतील रस्त्यावर भरना ऱ्या आठवड़ी बाजाराला नियोजित ठिकान असावे यासाठी तत्कालीन ग्राम.प.प्रशासनाने नियोजित जागा घेऊन त्यात ओठयाची व्यवस्था केलि मात्र अल्पावधितच त्या ठिकाणी बाजार भरने बंद झाले त्यामुळे पूर्वीचा रसत्यावरिल बाजार पुन्हा रस्त्यावर सुरु झाला परिणामी आठवड़ी बाजारामुळे वाहतुकीची कोंडी आजही कायम आहे शहरातील अंतर्गत रस्तेच नाही तर मुख्य रस्ते सुद्धा अतिक्रमानाने वेढले असल्याने अतिक्रमाणित शहर म्हणून ओळखले जाते.

         शहरात इतर दिवस गुजरी भरते तर गुरुवार दिवस आठवडा बाजार भरतो. यात गुरुवार मुख्य बाजार असून हजारो नागरिक बाजारात येतात. मात्र या बाजाराची शिस्त बिघडल्याने सावलीला गुरुवार हा वाहतुक कोंडीचा वार ठरत आहे. त्यामुळे पोलिस व नगर पंचायत ने बाजाराला शिस्त लावण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून मागणी केली जात आहे.

            सावलीत गडचिरोली, चंद्रपूर तसेच सावली हरंबा रस्त्यावर आठवडी बाजार चौक यासह परिसरात मुख्य बाजार विस्तारतो. शहरातील शासकीय व निमशासकीय कार्यालय असलेल्या भागात गुरुवारी आठवडा बाजार भरतो. आठवडी बाजार व दैनंदिन भाजीपाला ब्रिकी करणाऱ्या विक्रेत्यांच्या माध्यमातून नगरपंचायतला लाखो रुपयांचा कर मिळतो. 

            गुरुवारी आठवडा बाजारात हरंबा व गडचिरोली मार्ग कोंडीत सापडते अन्य गल्ल्यांमध्ये विविध ठिकाणी व मुख्य मार्गावर अनेक ठिकाणी विखुरल्याप्रमाणे बाजार भरतो. तालुक्यातील शेतकरी व व्यापारी विक्रेते येतात. दुसरीकडे रस्तारस्त्यावर व हरंबा रोड आईडिबी आई बँक समोर तसेच चंद्रपूर -गडचिरोली मुख्य मार्गावर बाजार भारत असतो सदर बाजार विक्रेते रस्त्यावर आपआपले सामान लावीत असल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण होऊन छोटे मोठे अपघात होत असतात.

            तसेच पार्किंगची व्यवस्था नसल्याने दुचाकी चारचाकी वाहने रस्त्यावर उभी ठेवीत असल्याने तासन्तास वाहतूक ठप्प होत असल्याचे चित्र दिसते परिणामी बाजाराची शिस्त बिघडते त्यामुळे पोलीस व नगरपंचायत यांनी शिस्त लावणे गरजेचे असल्याचे नागरिकांत बोलले जात आहे दरम्यान गुरूवारचा आठवाड़ी बाजारा वाहतुकीची कोंडी निर्माण करणारा दिवस ठरत असल्याने नियोजित ठिकाणी बाजार भरविन्यात यावा अशी मागनीही यावेळी केलि जात आहे.

  कोट

नवीन बाजार ओटे ठरले शोभेची वस्तू 

             अनेक वर्षांपासून ग्रामपंचायत अस्तित्वात असताना लाखो रुपये खर्च करून नियोजित आठवडी बाजारपेठ साठी जागेची खरेदी करून सदर जागेवर ओटे बांधकाम सुद्धा करण्यात आले. मात्र तेच ओटे जीर्ण होऊनही त्या ओट्यावर बाजार भरविला जात नसल्याने बाजार ओटे शोभेची वस्तू ठरत आहे. सावली नगरपंचायतच्या नियोजन शुन्य क़ामामुळे सावलीकराणा विविध समस्यांना सामोरे जावे लागन्याची वेळ निर्माण होत आहे.

      प्रीतम गेडाम

नगरसेवक, नगरपंचायत सावली 

***

विद्यार्थीही वाहतुकीच्या कोंडीत 

चंद्रपूर -गडचिरोली मुख्य रस्त्यालागतच विश्वशांती व रमाबाई आंबेडकर विद्यालये असून या दोन्ही शाळा लगतच सावली हरंबा रोड असून रोडवर बाजार विक्रेते आपापली दुकाने थाटीत असल्याने रोड फाट्यावरच वाहतूक विस्कळीत होत असते. त्यामुळे विद्यार्थाना व नागरिकांना ये -जा करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते.