शालेय विद्यार्थ्यांसाठी वेळेवर धावणारी बस सेवा असावी – डॉ. सतिश वारजुकर.. — विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात टाकतोय वेळेवर न धावणारी बस.. — चिमूर-जांभुळघाट-आंबेनेरी -भिसी-आंबोली ते कपर्ला बस नियमित सुरु ठेवण्यास आगारप्रमुखांची अनास्था..

     रामदास ठुसे

विशेष विभागीय प्रतिनिधी..

           ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यास कुठल्याही प्रकारची अडचण येवू नये म्हणून महाराष्ट्र शासनाने विशेष सवलती दिल्यात.यात लालपरी एसटी बसचा सुध्दा समावेश आहे.

         हि लालपरी एसटी बस नियमित व वेळेवर धावत नसेल आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यासी खेळत असेल तर त्या परिसरातील बसस्थानक आगारप्रमुखांच्या बाबतीत विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी काय विचार करावा?याबाबत चिमूर बसस्थानक आगारप्रमुख काही सांगतील काय?हा मुद्दा पुढे येतो आहे.

        चिमूर आगाराची,चिमूर-जांभुळघाट-आंबेनेरी-भिसी-आंबोली-कपर्ला मार्गे धावणारी बस ही वेळेवर मार्गक्रमण करीत नसल्यामुळे भिसी व चिमूरला शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान करते आहे.

         याचबरोबर रविवार सह बऱ्याच दिवसी चिमूर ते कपर्ला बस या मार्गावर धावतच नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान बस करतय हे निख्खळ वास्तव आहे.

          आज परत चिमूर बसस्थान आगारच्या चिमूर ते कपर्ला बसने धोका दिल्याने शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी आपापल्या बसस्टँडवर सदर बसची वाट बघूबघू थकून गेले.

              या घटनेची माहिती माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.सतिश वारजूकर यांना होताच,”ते संवेदनशील झाले,व सर्व कामे बाजूला सारून आपल्या खाजगी वाहणात विद्यार्थ्यांना बसवून परिवहनचे चिमूर बसस्थानक आगार गाठले व आगारप्रमुखांशी चर्चा करून,”चिमूर ते कपर्ला,मार्गे नियमित व वेळेवर बससेवा सुरू ठेवावी असे स्पष्ट सांगितले.

            कपर्ला ते चिमूर मार्गावरील शालेय विद्यार्थ्यांचे बससेवा अभावी नुकसान झाल्यास चिमूर बसस्थान आगारप्रमुख जबाबदार राहतील असे सुतोवाच सोडले.

               दरम्यान खाजगी वाहनचालकांकडून वाजवी भाडे आकारून विद्यार्थी तसेच प्रवाशांची लुट केली जात आहे.विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी परिवहन मंडळाने चिमूर,जांभुळघाट, कपर्ला,आंबेनेरी,पारडपार,बस सुरू करावी अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश तथा समन्व्यक चिमूर विधानसभा डॉ. सतिश वारजूकर यांनी केली

          गेल्या अनेक महिन्यांपासून कपर्ला,आंबेनेरी, पारडपार ही बस सेवा साळकरी विद्यार्थ्थांच्या वेळेवर येत नसल्याने शालेय विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान झाल्याचे समोर आले आहे. 

         बहुतांश विद्यार्थ्यांनी मिळेल त्या खाजगी वाहनांचा आधार घेऊन शाळेत पोहचत आहेत तर ब-याच विद्यार्थी वाहन नसल्याने अजूनही शाळेत वेळेवर पोहचू शकत नसल्याचे चित्र समोर आले.

          ग्रामीण भागातील बहुतांश विद्यार्थी शहरी भागात जाऊन शिक्षण घेत आहेत.मात्र बससेवा वेळेवर नसल्याने शैक्षणिक नुकसान होत असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

         किसान सेल चिमूर तालुका अध्यक्ष राजू कापसे यांनी विद्यार्थ्यांप्रती सद्भावना बाळगून विद्यार्थ्यांच्या समस्यांची संपूर्ण माहिती डॉ.सतिश वारजूकर यांना दिली.

            आगारप्रमुखांशी चर्चा करताना चिमूर तालुका कांग्रेस कमिटी अध्यक्ष डॉ.विजय गावंडे,किसान सेल तालुका अध्यक्ष राजूभाऊ कापसे,माजी पंचायत समिती उपसभापती स्वप्नील मालके,व विद्यार्थी उपस्थित होते.