प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
जुनेद खान म्हटले की,चालते-बोलते-हसरे-समजदार व कर्तव्यदक्ष नेतृत्व.त्यांचे संवेदनशील कर्तव्य चंद्रपूर जिल्ह्यासह अख्या महाराष्ट्र राज्यातील राजकीय व सामाजिक धुरंधरांनी अनुभवले…
अशा या संवेदनशील व्यक्तीमत्वाने आज मुंबई येथे राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ,माजी मंत्री तथा आमदार विजयभाऊ वडेट्टीवार, महाराष्ट्र प्रदेश महासचिव डॉ.सतीश वारजूकर,तरुण नेतृत्व ऋषी वैध व अनेक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.
राज्यातील भाजपाच्या सर्व पदाचा राजीनामा जुनेद खान यांनी नुकताच दिला होता.त्यानंतर त्यांनी आज मुंबई मध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश केला.
जुनेद खान तसे सतर्क व चाणक्य नीतीचे आहेत.चिमूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार किर्तीकुमार भांगडीया यांना आमदार बनविण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.
याचबरोबर संतोष गोहणे,सतिश वनकर यांनी मुंबई दादर येथील काँग्रेस कार्यालयात आज दिनांक १३ नोव्हेंबर रोज गुरुवारला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ,विधीमंडळाचे विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते प्रवेश घेतला.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटनीस डॉ. सतीश वारजूकर,ऋषी वैध आणि इतर अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
जुनेद खान हे प्रामुख्याने मुळचे चिमूरचे रहिवासी असून सध्या ते मुंबईत वास्तव्याने आहेत.
जुनेद खान यांचा राजकीय प्रवास आणि त्यांचे संघटन कौशल्य अत्यंत वाखाणण्याजोगे आहे.यामुळे येणाऱ्या काळात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला त्यांच्या अनुभवाचा फायदा होईल एवढे निश्चित!



