गेवरा येथे तथागत बुद्ध मुर्तीचे अनावरण 22 ला… — माजी मंत्री विजय वडेट्टीवार , प्रा. जोगेंद्र कवाडे यांची उपस्थिती…

ऋषी सहारे

संपादक

           सावली तालुक्यातील गेवरा ( बुजरूक ) येथे दि. २२ मे २०२३ ला सांयकाळी ४. 00 वाजता बुद्ध विहार गेवरा येथे तथागत बुद्ध मुर्तीचे अनावरण सोहळा व प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आलेला आहे . कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पिपल्स रिपब्लिकन पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष , लॉग मार्च प्रणेते माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे हे राहणार असुन तथागत बुद्ध मुर्तीचे अनावरण माजी मंत्री तथा आमदार विजयभाऊ वडेट्टिवार यांच्या हस्ते पार पडणार आहे. सकाळी १० वाजता बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना पुज्य भन्ते भागीरथ व भन्ते गण बुद्ध विहार कोठरी परिसर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणुन अँड. राम मेश्राम माजी जि. प. सदस्य गडचिरोली . पिरिपाचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर , रिपाई नेते गोपाल रायपूरे , सामाजीक कार्यकर्ते अँड. विनय बाबोळे. पिरिपाचे सावली तालुका प्रमुख उत्तम गेडाम,माजी सरपंच किरण पा. चन्नावार गेवरा, माजी सभापती दिनेश पाटिल चि टमुलवार, पिरिपाचे कार्याध्यक्ष मुरलीधर भानारकर आरमोरी , उपाध्यक्ष मारोती भैसारे , सामाजीक कार्यकर्त्या कल्पना लाळे गडचिरोली आदी लाभणार आहेत . तयागत बुद्ध मुर्ती दानकर्ते जयकुमार शेन्डे सर यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात येणार असुन रात्रौ ८ . 00 वाजता विजयकुमार शेन्डे चुरमुरा यांचा भीमगिताचा स्टेजप्रोग्राम होणार आहे तरी बहुसंख्य नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन बौद्ध समाज मंडळ गेवरा च्या पदाधिकार्‍यानी केलेले आहे .