तेलंगणाच्या धर्तीवर महाराष्ट्रही सुजलाम सुफलाम होऊ शकतो… — दिपक दादा आञाम, भारत राष्ट्र समितीचे नेते माजी आमदार विभागीय अध्यक्ष आविसं…

ऋषी सहारे

संपादक

         तेलंगणा राज्य आंध्र प्रदेशातून वेगळं करण्यासाठी सतत आंदोलन करुन तेलंगणाची २०१४ निर्मिती झाली.उद्देश हा कि, छोट्या राज्यांची प्रगती, विकास जलदगतीने होतो.त्याचाच परिणाम अवघ्या ८/९ वर्षात तेलंगणाचे मुख्यमंत्री के.सी.आर. यांनी संबंध भारत देशाला दाखवून दिले. तेलंगणा राज्य आज परिपूर्णपणे विकास घडलेला जनतेला दिसून येत आहे.म्हणूणच तेलंगणाच्या धर्तीवर महाराष्ट्रही सुजलाम सुफलाम होऊ शकतो. देसाईगंज ( वडसा ) येथे भारत राष्ट्र‌ समिती पक्षाचे वतीने शासकिय विश्राम गृहात आयोजित मेळाव्यात दिपक दादा आञाम भारत राष्ट्र समिती नेते, माजी आमदार तथा विभागीय अध्यक्ष ‌आविसं उद्घाटक ‌व प्रमुख मार्गदर्शक ‌म्हणून बोलत होते.

     पुढे बोलताना दिपकदादा आञाम म्हणाले तेलंगणाचे मुख्यमंत्री के.सी.आर. यांनी शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार, मध्यमवर्गीय सर्वहारा व तळागाळातील जनतेसाठी विशेष विविध प्रकारच्या योजना राबवून तेलंगणा राज्य समृद्ध केले आहे.शेतऱ्यांना २४ तास मोफत विद्युत विज, पेरणीसाठी अगोदरच एकरी १०,०००/-रुपये मदत केली जाते.नदी जोड प्रकल्पामुळे १०० टक्के क्षेत्र सिंचनाखाली आलेले आहे.शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यास ( अपघात किंवा नैसर्गिक) त्यांच्या कुटुंबीयांना ५,००,००० रु.तात्काळ मदत केली जाते, सरकार स्वतःच शेतकऱ्यांचे धान्य खरेदी करते.दु:खद किंवा आकास्मिक प्रसंगासाठी १००टक्के प्रिमियम देणारी विमा योजना सरकार स्वतःच राबवते व शेतकरी मंच योजना व्दारे ५००० एकर चा एक समुह करून त्यासाठी एक स्वतंत्र कृषी अधिकारी काम करतो.कल्याण लक्ष्मी व‌ शादी मुबारक योजने अंतर्गत मुलींच्या लग्नासाठी १,००,१००/-रु.‌विना अट तात्काळ मदत केली जाते.जेष्ट‌ नागरिकांना व एकट्या स्त्रीयांना दरमहा २०१६/-विना अट तात्काळ मदत ,दिव्यांगासाठी दरमहा ३०१६ रु.पेन्शन ‌गरीब व गरजू जनतेसाठी १०० टक्के अनुदानावर २ बेडरूम किचन घरे दिली जातात.दलीत व आदिवासींयांना उद्योग करण्यासाठी प्रोत्साहन योजना.दलितांच्या प्रत्येक कुटुंबाला विना परतफेड १० लाख रु.एक‌ रक्कम दिली जाते.धनगर समाजाला मेंढ्या पाळण्यासाठी मोफत मेंढ्या वाटप केल्या जातात.मिशन भगीरथ अंतर्गत शेतीला सिंचनासाठी मुबलक पाणी तर पिण्यासाठी प्रत्येक घरात नळ, स्वच्छ,व मुबलक पाणी पुरवठा करण्यात येतो. गरोदर व स्तनदा मातांसाठी सर्व मोफत वैद्यकीय सुविधा आणि बाळाच्या जन्मानंतर १२०००/-तर मुलींच्या जन्मानंतर १३०००/-रु.संगोपनासाठी दिले जातात.कंटी वेलमु जगातील सर्वात मोठे नेञ शिबिर आयोजित करण्यात आले आहे.आपले गाव आपली शाळा शिक्षण योजना राबवून शिक्षणावर भर दिला जात आहे.इत्यादीमुळे तेलंगणा राज्य एक समृद्ध राज्य झाले आहे.शेतकरी समृद्ध झाल्याने एकही आत्महत्या होत नाहीत.महाराष्टृ तर नैसर्गिक रित्या समृद्ध आहे.तेलंगणात राबविण्यात येत असलेल्या विविध योजना महाराष्ट्रात राबविने सहज शक्य आहे.परंतू राज्यकर्त्यांची तशी मानसिकता नाही.म्हणूनच तमाम जनतेनी बेगडी प्रेम दाखवणाऱ्या सर्वच पक्षांना विचारले पाहिजे जे तेलंगणात होऊ शकतो ते महाराष्ट्रात का नाही.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुञसंचालन व आभारप्रदर्शन चुन्नीलाल मोटघरे यांनी केले तर बाबू कुरेशी,सागर बन्सोड यांनी अथक परिश्रम घेतले.