शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी…
चिमूर :-
चिमूर तालुकातंर्गत जागतीक गोंड-सगा-मांदी समाज तर्फे भिमालपेन जागरण गोंगो महापूजा गोंडी संस्कृती महोत्सव संपन्न झालाय.
बिरसा मुंडा,विर बाबूराव पुल्लेसूर शेडमाके यांच्या प्रतिमेंला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले आणि विनम्रपणे अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून डॉ.सतिश वारजूकर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष,रोशन ढोक चिमूर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष,सौ.सरीता गुरुनुले सरपंच ग्रामपंचायत पळसगांव,तुळसिदास शेरकुरे उपसरपंच ग्रामपंचायत पळसगांव,छत्रपाल मसराम माजी सरपंच ग्रामपंचायत पळसगांव,लोकेश कावळे,सुभाष बन्सोड मासळ सर्कल प्रमुख,रत्नपाल मसराम गोंड समाज अध्यक्ष,मनोज कुभरे गोंड समाज उपाध्यक्ष,राजेंद्र केराम गोंड समाज सचिव,हपिज शेख ग्रामपंचायत सदस्य पळसगांव,हे प्रामुख्याने उपस्थित होते.
या कार्यक्रमाप्रसंगी डॉ. सतिष वारजूकर यांनी उपस्थित सर्व गावकऱ्यांना,गोंड-सगा-मांदी पुरुष बंधवाना आणि महिला भगिनींना उचित मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमाला गावातील नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.



