रा.तु.महाविद्यालयात ग्रंथ प्रदशनी…

    रामदास ठुसे 

विशेष विभागीय प्रतिनीधी 

      चिमूर/- स्थानिक राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालयात ग्रंथालय विभाग व विद्यार्थी कल्याण विभागाच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवनावरील विविध चरित्रे ग्रंथाचा, पुस्तकांचा परिचय व्हावा म्हणून ग्रंथदालन खुले केले. विद्यार्थ्याना विविध पुस्तके हाताळता आली.

        या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. अश्वीन चंदेल होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर कमी करावा. तसेच आभासी जगातील तंत्रज्ञानातून पुस्तकांची माहिती मिळते. परंतु प्रत्यक्ष पुस्तके हाताळण्याचा अनुभव आनंद वेगळाच असतो.

          प्रसंगी डाँ प्रफुल राजुरवाडे यांनी मार्गदर्शनात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पुस्तक प्रेम विशद केले. प्रा डॉ कार्तिक पाटील प्रा पितांबर पिसे विद्यार्थी कल्याण विभागाचे डॉ. राजेश्वर राहागंडाले प्रा. आशुतोष पोपटे शारिरिक शिक्षण संचालक डॉ उदय मेंढूलकर , प्रा. गुणवंत वाघमारे, प्रा. रिना भोयर, प्रा. किशोर चटपकर ग्रंथालय परीचर सौ.हिना राऊत आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथालय प्रमुख डॉ. शैलेश भोयर तर आभार पंकज शिरभय्ये यांनी केले.