EWS व खुला प्रवर्गाला गडचिरोली पोलीस भरतीत ना.धर्मरावबाबा आत्राम यांनी मिळवून दिले न्याय… — तनुश्रीताई धर्मराव आत्राम व पोलीस बॉईज असोसिएशनच्या प्रयत्नाला यश…   — तब्बल 170 जागेची झाली वाढ पोलीस भरती युवकांसाठी आनंदाचे वातावरण… 

भाविक करमनकर

तालुका प्रतिनिधि धानोरा

          सध्या गडचिरोली जिल्हा पोलिस भरती मध्ये 742 शिपाई पदाच्या जागा निघाला होता. त्यात EWS आणि खुला प्रवर्गाला एकही जागा गृहविभागाने दिला नव्हता. त्या अनुषंगाने पोलीस बॉईज असोसिएशन गडचिरोली यांनी पोलीस भरती तयारी करणारे युवकांना घेऊन तनुश्री धर्मराव बाबा आत्राम यांचेमार्फत ना.मंत्री धर्मरावा बाबा आत्राम यांना 4 मार्च रोजी भेट घेतली व निवेदन दिले.

            तात्काळ बाबा आत्राम यांनी उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली व पोलीस शिपाई पदाच्या तब्बल 170 जागेची वाढ खालील प्रमाणे केली ई डब्ल्यूएस 50, खुला 70, एसिबिसी 50 जागेची वाढ केली त्याकरिता पोलीस भरती तयारी करणारे युवकांकडून तनुश्री धर्मराव बाबा आत्राम व पोलीस बॉईज असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष गिरीश कोरमी व जिल्हा उपाध्यक्ष आकाश ढाली ,कार्यकारी अध्यक्ष रजत कुकुडकर व प्रंतोष विश्वास,रणजित रामटेके,निखिल बरसगडे,अशुतोष चांगलानी यांच्यावर शुभेच्छांच्या वर्षाव होत आहे.