पोलीस ठाणे चिखलदरा जि. अमरावती डायल 112 वर खोटी माहीती देणाऱ्या इसमा विरुध्द गुन्हा दाखल.. 

अबोदनगो सुभाष चव्हाण

तालुका प्रतिनिधी चिखलदरा

          दखल न्युज भारत 

चिखलदरा:

पोलीस स्टेशन चिखलदरा येथे एका कॉलरने डायल करून 112 वर माहीती दिली कि,मी दिनांक 08.03.2024 रोजी दुपारी एका महीलेचा खुन केला असून मला पोलीस स्टेशनला जमा व्हायचे आहे. अशा माहीती वरुन घटनेची गंभरता लक्षात घेवून पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार सदर कॉलरला फोन लावित होते, परंतु त्याचा फोन बंद येत होता.

      सदर कॉलरने रात्री दरम्यान एकुण 03 कॉल केले.सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता कोणत्याही प्रकारची अशा प्रकारची घटना घडलेली दिसुन आली नाही. 

      सदर घटने अनुशंगाने तांत्रिक तपास केला असता सदर कॉलर हा कोयलारी येथिल राहणारा होता. पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सदर गावात जाऊन अधिक चौकशी केली असता कोणत्याही प्रकारची खुनाची घटना झाली नसल्याचे निष्पन्न झाले. 

      यावरुन कॉल करणारा इसम नामे बिरज चन्नु कास्देकर वय 34 वर्ष रा.कोयलारी याचे विरुध्द पो. स्टे.चिखलदरा येथे अदखलपात्र गुन्हा क्र 120/2024 कलम 177 भा. द. वि. प्रमाणे दाखल करण्यात आला आहे. 

       सदर गुन्ह्याचा तपास करुन पुढील कायदेशीर कार्यवाही पोलीसामार्फत करण्यात येत आहे.

***

       याव्दारे परीसरातिल नागरीकांना सुचित करण्यात येते कि,डायल 112 ही प्रणाली लोकांच्या मदतीसाठी तयार करण्यात आली आहे.परंतु काही नागरीकांकडुन डायल 112 वर खोटी माहीती दिल्याने पोलीस यंत्रणेचा वेळ वाया जातो आहे. तेव्हा नागरीकांनी खुना सारख्या गंभीर गुन्ह्याची खोटी माहीती देवु नये.

पो.नि.आनंद पिदुरकर

        ठाणेदार 

पो.स्टे.चिखलदरा