चिमूर येथे राष्ट्रीय विकासात युवकाचे योगदान या विषयावर राज्यस्तरीय चर्चा सत्र संपन्न…

     रामदास ठुसे 

विशेष विभागीय प्रतिनिधि

चिमूर:-

         १२ जानेवारीला आठवले समाजकार्य महाविद्यालय चिमूर येथे कान्ट्रीब्युशन ऑफ युथ सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या विचारातुन राष्ट्रीय विकास या विषयावर राज्यस्तरीय चर्चासत्र नुकतेच घेण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन प्राचार्य डॉ. शुभांगी लुंगे, प्रमुख पाहुणे तायवाडे महाविद्यालय नागपूरचे डॉ.राजेंद्र वटाणे,प्रमुख वक्ते श्रीमती राजकमल बापूराव तिडके महाविद्यालय मौदा जि. नागपूरचे डॉ.व्यंकटेश पोटेफोडे, कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. सुदर्शन खापर्डे आदी मान्यवर उपस्थित होते.

           याप्रसंगी डॉ. राजेंद्र वटाणे मार्गदर्शनात म्हणाले की, देव आपणच निर्माण करीत असतो.आपण आपले दैव बदलू शकतो. विद्यार्थ्यांनी सर्वसमभाव ठेवावा, तरुण दुर्बल असेल तर राष्ट्राचा मृत्यु होतो, ज्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवला, त्यांना कधीही धोका देवु नका. दुसन्याला आनंद आणि शांती प्रदान करावी. महापुरुषाचे विचार अंगीकारावे, तसेच डॉ. व्यंकटेश पोटेफोडे यांनी जिजाऊ बाबत मार्गदर्शन करुन विद्यार्थ्यांनी व्देष भावना ठेवु नये असे सांगुन जिजाऊचा संपुर्ण इतिहास सांगितला. तसेच प्राचार्य डॉ. शुभांगी लुंगे यांनी ज्ञानाई सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांनी समाजाला उन्नतीकडे नेलेले आहे. युवकांनी प्रेरीत होवुन थोर महान महिलांच्या कार्याचा वसा घ्यावा असे त्या बोलले. याप्रसंगी विद्यापीठातुन प्रथम आलेल्या बी. एस. डब्लु. पास विद्यार्थीनी कु. कोमल वंजारी हिचा शाल व वृक्ष देवुन सत्कार करण्यात आला.

          कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. शिल्पा गणविर यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ. सुदर्शन खापर्डे यांनी मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.