राजेंद्र रामटेके
विशेष प्रतिनिधी
आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी आज तालुका आरमोरी मधील चुरमुरा गावाला भेट देऊन गावातील नागरिकांशी संवाद साधला. भेटीदरम्यान त्यांनी नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेतल्या व त्यावर सविस्तर चर्चा केली.
ग्रामस्थांनी गावातील रस्त्यांची खराब अवस्था, नाल्यांची सफाई न होणे, नळाला गाडूल (मळलेले) पाणी येणे यासारख्या मूलभूत अडचणी मांडल्या. याशिवाय अलीकडील अतिवृष्टीमुळे गावात पूरस्थिती निर्माण होऊन शेतीचे मोठे नुकसान झाले असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.
या सर्व समस्या गांभीर्याने ऐकून आमदार मसराम यांनी संबंधित विभागांशी तातडीने संपर्क साधून उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.
गावकऱ्यांनी त्यांच्या भेटीबद्दल समाधान व्यक्त केले असून, शासन दरबारी आपली व्यथा मांडणारा प्रतिनिधी मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
या वेळी उपस्थित धनपाल मिसार सर, मुखरु पाटील देशमुख,रवींद्र कांबळे,जगदीश रामटेके,वामनजी देशमुख,भूपेंद्र काळबांधे,सुधाकर सातपुते,मोन्टु रामटेके,सोमनाथ मानकर,मोहन म्हस्के,जगदीश रामटेके,भक्तदास मोटघरे,सोमनाथ मानकर, व गावकरी मंडळी उपस्थित होते.



