राजेंद्र रामटेके
विशेष प्रतिनिधी
घाटी ता.कुरखेडा, घरकुलासाठी आवश्यक रेती ग्रामसभेच्या मंजुरीने वाहतूक करत असताना ट्रॅक्टर जप्त करण्यात आला. या कारवाईच्या विरोधात ग्रामसभेच्या वतीने स्थानिकांनी आमरण उपोषण व सत्याग्रह आंदोलन सुरू केले आहे.
या आंदोलनाची दखल घेत आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी घाटी येथे भेट दिली व ग्रामस्थांशी संवाद साधला.
“ग्रामसभेच्या हक्कात शासन किंवा कोणतीही यंत्रणा हस्तक्षेप करू शकत नाही. आदिवासी भागात घरकुलासाठी रेती वापरणे हा मूलभूत अधिकार आहे. याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल,”असे आमदार मसराम यांनी सांगितले.
ग्रामस्थांनी सांगितले की, घरकुल उभारणीसाठी रेतीची आवश्यकता होती आणि ती ग्रामसभेच्या लेखी मंजुरीनंतरच वाहतूक करण्यात आली होती. मात्र तरीही ट्रॅक्टर जप्त झाल्यामुळे संतप्त नागरिकांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे.



